शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी गुन्ह्यातील कोल्हापुरातील सहायक फौजदार मिलिंद नलावडे निलंबित, पोलिस अधीक्षकांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:21 IST

अकलूज पोलिसांकडून शोध सुरू

कोल्हापूर : अकलूज (जि. सोलापूर) येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवरील मोक्काची कारवाई रद्द करण्याचे आमिष दाखवून ६५ लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीतील सहायक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे (पोलिस मुख्यालय, कोल्हापूर) याचे निलंबन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी कारवाईचा आदेश काढला. कारवाईची चाहूल लागताच तो वैद्यकीय रजा घेऊन पसार झाला आहे. अकलूज पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे आलेला मोक्का कारवाईचा प्रस्ताव रद्द करण्याचे आमिष दाखवून हुपरी येथील समीर पानारी याने अकलूजमधील तरुणाकडे ६५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. गुन्हा दाखल होताच अकलूज पोलिसांनी पानारी याला अटक करून अधिक चौकशी केली असता, कोल्हापुरातील सहायक फौजदार मिलिंद नलावडे याच्यासह आणखी तिघांची नावे निष्पन्न झाली.

खंडणी प्रकरणात थेट एका पोलिसाचा सहभाग असल्याचे समजताच विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कठोर कारवाई करण्याचा आदेश अकलूज पोलिसांना दिला होता. कारवाईची चाहूल लागताच सहायक फौजदार नलावडे रजा टाकून पळाला. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती मिळताच पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. अकलूज पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून, अद्याप तो सापडलेला नाही.पाच जणांवर गुन्हाया गुन्ह्यात समीर अब्बास पानारी (३५, रा. महावीर नगर, हुपरी, ता. हातकणंगले), सतीश रामदास सावंत (५०, रा. उपळाई बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर), सहायक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे (पोलिस मुख्यालय, कोल्हापूर), कमलेश रमेश कानडे (रा. लालबाग, मुंबई) आणि लाला ऊर्फ लालासाहेब ज्ञानेश्वर अडगळे (रा. अकलूज) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील समीर पानारी आणि लाला ऊर्फ लालासाहेब अडगळे या दोघांना अटक झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Assistant Sub-Inspector Suspended in Extortion Case; Police Action

Web Summary : Assistant Sub-Inspector Milind Nalavade suspended for demanding ₹65 lakh extortion, promising to quash MCOCA charges. He fled after the case surfaced. Police search underway for the absconding officer involved in the crime.