शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘अहिंसा परमो: धर्म की जय’ जयघोषाने दुमदुमले शहर, भगवान महावीर जयंती उत्सहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 18:30 IST

भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध संस्था, संघटना व ट्रस्टच्या वतीने आरोग्य तपासणी, व्याख्यान आणि अन्नदान आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; तसेच शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे ‘अहिंसा परमो: धर्म की जय’ जयघोषाने दुमदुमले कोल्हापूर भगवान महावीर जयंती उत्सहात; शोभायात्रेचे आयोजन

कोल्हापूर : भगवान महावीर यांची जयंती गुरुवारी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध संस्था, संघटना व ट्रस्टच्या वतीने आरोग्य तपासणी, व्याख्यान आणि अन्नदान आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; तसेच शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.महावीर जयंती निमित्त सकाळी गंगावेश येथील मानस्तंभ जिन मंदिरात सकाळी साडेसात वाजता भगवान महावीरांचा पंचामृत अभिषेक झाला. त्यानंतर महावीर जन्मकाळ सोहळा साजरा केल्या. सकाळी नऊ वाजता भट्टारकरत्न डॉ. लक्ष्मीसेन महाराज यांच्या हस्ते यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. त्यानंतर समस्त जैन समाजातर्फे काढण्यात आलेल्या मुख्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. याप्रसंगी नगरसेवक ईश्वर परमार, रत्नेश शिरोळकर, किरण शिराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोल्हापुरात भगवान महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी समस्त जैनबांधवांच्यावतीने गंगावेश ते दसरा चौक येथे पालखी व रथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.(छाया : आदित्य वेल्हाळ)‘महावीर भगवान की जय’, ‘जैन धर्म की जय’, ‘अहिंसा परमो: धर्म की जय..’असा जयघोष, रथात फुलांनी सजवलेल्या रथात भगवान महावीरांची मूर्ती, ‘जगा आणि जगू द्या’चे संदेश देणारे चित्ररथासह मिरवणुकीच्या सुरुवात झाली. मिरवणुकीत भगवान महावीरांनी दिलेला ‘जगा आणि जगू द्या’चा संदेश चित्ररथाद्वारे साकारण्यात आला होता.

गंगावेशमधील मानस्तंभ मंदिर, कसबा गेट, शिवाजी चौक, बिंदू चौक, गुजरी, पापाची तिकटी, पानलाईन, महापालिका चौक, अयोध्या टॉकीजमार्गे दिगंबर जैन मंदिर दसरा चौक येथे मिरवणूक विसर्जित झाली. याठिकाणी भगवान महावीरांचा अभिषेक, पूजा व आरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले.दिगंबर जैन बोर्डिंग येथे दुपारी चार वाजता अब्दुल अजिज. यु. राजपूत विजापूर यांचे ‘उत्तर कर्नाटक के पौराणिक जैन बसदि’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर विविध स्पर्धेचे बक्षिस वितरणसह समाजातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला - मुलींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी भरत सांगरूळकर, सुरेश मगदूम, आनंद पाटणे, सुनिल दुणूंग, शरद पाटील, सुरेश मगदूम, गुणवंत रोटे, डॉ. सुषमा रोटे यासह समाजातील श्रावक - श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Mahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८kolhapurकोल्हापूर