कोल्हापूर : पैसे पडल्याचे सांगून विवाहितेची पर्स लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 16:29 IST2018-10-23T16:27:28+5:302018-10-23T16:29:32+5:30
रस्त्यावर पैसे पडल्याचे सांगून विवाहितेच्या कारमधील पर्स दोन अज्ञाताने चोरुन नेल्याची घटना सोमवारी (दि. २२) सकाळी बिनखांबी गणेश मंदिराजवळ घडली. याबाबत विराज अजित महात (वय ४५, प्लॉट नंबर ४०१ , रा. फुलेवाडी पहिला बसस्टॉप, शेतकरी हॉटेलजवळ , कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिसात दिली.

कोल्हापूर : पैसे पडल्याचे सांगून विवाहितेची पर्स लंपास
कोल्हापूर : रस्त्यावर पैसे पडल्याचे सांगून विवाहितेच्या कारमधील पर्स दोन अज्ञाताने चोरुन नेल्याची घटना सोमवारी (दि. २२) सकाळी बिनखांबी गणेश मंदिराजवळ घडली. याबाबत विराज अजित महात (वय ४५, प्लॉट नंबर ४०१ , रा. फुलेवाडी पहिला बसस्टॉप, शेतकरी हॉटेलजवळ , कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिसात दिली.
पोलिसांनी सांगितले की, विराज महात या कार घेऊन बिनखांबी गणेश मंदिरजवळ सोमवारी आल्या होत्या. त्यावेळी दोन अज्ञात त्यांच्याजवळ आले. त्यांनी विराज महात यांना ‘तुमचे रस्त्यावर पैसे पडले आहेत’ असे सांगितले. त्यावर त्या रस्त्यावर पडलेले पैसे घेत असताना अज्ञातांनी कारच्या खिडकीच्या उजव्या बाजूस हात घालून पर्स घेऊन ते पसार झाले.
त्यानंतर त्यांनी कारमध्ये पाहिले असता पर्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पर्समधील २३ हजार रुपये, पर्स व स्मार्ट कार्ड असा सुमारे २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे महात यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याची नोंद रात्री झाली.