शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोल्हापूर : न्यायालयीन शुल्कवाढीविरोधात वकील बांधव रस्त्यावर, परिपत्रकाची होळी, कामकाजापासून अलिप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 4:58 PM

महाराष्ट्र शासनाने केलेले अन्यायी व भरमसाट न्यायालयीन शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील वकील गुरुवारी न्यायालयीन कामकाजापासून गुरुवारी अलिप्त राहिले. या दरवाढीविरोधात कसबा बावड्यातील न्यायसंकुलाच्या इमारतीबाहेर वकिलांनी शासनाच्या परिपत्रकाची होळी करून व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली. याबाबत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

ठळक मुद्दे न्यायालयीन शुल्कवाढीविरोधात वकील बांधव रस्त्यावर परिपत्रकाची होळी, कामकाजापासून अलिप्त

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने केलेले अन्यायी व भरमसाट न्यायालयीन शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील वकील गुरुवारी न्यायालयीन कामकाजापासून गुरुवारी अलिप्त राहिले. या दरवाढीविरोधात कसबा बावड्यातील न्यायसंकुलाच्या इमारतीबाहेर वकिलांनी शासनाच्या परिपत्रकाची होळी करून व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली. याबाबत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

शासनाने न्यायालयीन शुल्कात अन्यायकारक वाढ केलेली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी मुदत अर्ज करायला पक्षकाराला पूर्वी दहा रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प लागायचे; पण शासनाने यामध्ये पाचपट वाढ केली आहे. आता त्याला दहा रुपयांऐवजी ५० रुपये लागणार आहेत. त्याचबरोबर पूर्वी एखाद्या दाव्यात (मिळकतीच्या किमतीवर) कोर्ट फी कमाल तीन लाख रुपये लागत होती. पण, आता ती दहा लाख रुपये लागणार आहे.

या अन्यायी दरवाढीविरोधात गुरुवारी सकाळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली न्यायसंकुलाबाहेर वकिलांनी या परिपत्रकाची होळी केली. त्यानंतर सर्वजण दुपारी रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयात आले. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेतली.वंचिताला सुलभ, स्वस्त व जलद न्याय द्यावा व तो कसा मिळेल हे शासनाचे काम आहे व तसे शासनाचे धोरण असणे आवश्यक आहे. मात्र, अन्यायी शुल्क दरवाढ करून शासनाने सामान्य नागरिकास सुलभ न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण केला आहे. शासनाने या कृतीचा फेरविचार करावा व केलेली अन्यायकारक शुल्कवाढ तत्काळ रद्द करावी ,अशी भूमिका वकिलांनी यावेळी मांडली. यावर तुमच्या भावना शासनाला कळवू, असे आश्वासन सुभेदार यांनी शिष्टमंडळाला दिले.

शिष्टमंडळात जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. नारायण भांदिगरे, सेक्रेटरी अ‍ॅड. किरण पाटील, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य अ‍ॅड. शिवाजीराव चव्हाण, अ‍ॅड. के.ए. कापसे, अ‍ॅड. के. के. सासवडे, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. बी. एम. शास्त्री, अ‍ॅड. विलास दळवी, अ‍ॅड. मनोज पाटील, अ‍ॅड. धनंजय पठाडे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. व्ही. आर. पाटील, अ‍ॅड. एस. आर. पिसाळ, अ‍ॅड. विजय पोवार, अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. के. बी. शिरसाट, अ‍ॅड. किरण खटावकर, अ‍ॅड. विक्रम झिटे, अ‍ॅड. पिराजी भावके, अ‍ॅड. प्रणील कालेकर, अ‍ॅड. कीर्ती शेंडगे, अ‍ॅड. कुलदीप कोरगावकर, आदींचा सहभाग होता.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय