कोल्हापूर : कसबा बावड्यातील मंडळावर गुन्हा, विनापरवाना मंडप उभारलेप्रकरणी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 17:41 IST2018-09-14T17:37:17+5:302018-09-14T17:41:10+5:30
कसबा बावडा येथे महापालिकेची परवानगी न घेता रस्त्याच्या मधोमध गणेश मंडप उभा केल्याप्रकरणी छ. राजाराम कॉलनी, शुगरमिल कॉर्नर मित्रमंडळावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुरुवारी(१३) गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अध्यक्ष आनंदा बा गायकवाड, उपाध्यक्ष रोहन पंदारे, सचिव धैर्यशील पाटील यांचेसह पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कोल्हापूर : कसबा बावड्यातील मंडळावर गुन्हा, विनापरवाना मंडप उभारलेप्रकरणी कारवाई
कोल्हापूर : कसबा बावडा येथे महापालिकेची परवानगी न घेता रस्त्याच्या मधोमध गणेश मंडप उभा केल्याप्रकरणी छ. राजाराम कॉलनी, शुगरमिल कॉर्नर मित्रमंडळावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुरुवारी(१३) गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अध्यक्ष आनंदा बा गायकवाड, उपाध्यक्ष रोहन पंदारे, सचिव धैर्यशील पाटील यांचेसह पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या मंडळाने शुगरमिल कॉर्नर येथे रस्त्याच्या मधोमध मंडप उभारलेचे महापालिका प्रशासनाच्या लक्षात आले. त्यांनी मंडळाचे साहित्य जप्त करुन बाबुराव नारायण दबडे यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात मंडळाच्या विरोधात फिर्याद दिली.
रस्त्यावर खड्डे मारुन नुकसान केले आहे. तसेच सार्वजनिक रहद्दारीस अडथळा व उपद्रव करण्याचा प्रयत्न केलेचा ठपका मंडळावर ठेवला आहे.