कोल्हापूर :  भररस्त्यावर युवतीची छेड, अनोळखी विवाहित तरुणाचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 11:24 IST2018-11-15T11:22:10+5:302018-11-15T11:24:44+5:30

बॅँकेतून घरी जात असताना राजारामपुरीतील माउली पुतळा परिसरात थांबलेल्या २४ वर्षांच्या युवतीची दुचाकीवरून आलेल्या विवाहित तरुणाने छेड काढली. यावेळी त्याने तिच्या गालावर हात फिरवीत पलायन केले. रविवारी (दि. ११) दुपारी हा प्रकार घडला. भांबावलेल्या पीडित युवतीने बुधवारी अनोळखी तरुणाविरुद्ध राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

Kolhapur: The act of the victim, the unidentified married couple on the yatra | कोल्हापूर :  भररस्त्यावर युवतीची छेड, अनोळखी विवाहित तरुणाचे कृत्य

कोल्हापूर :  भररस्त्यावर युवतीची छेड, अनोळखी विवाहित तरुणाचे कृत्य

ठळक मुद्दे भररस्त्यावर युवतीची छेडअनोळखी विवाहित तरुणाचे कृत्य

कोल्हापूर : बॅँकेतून घरी जात असताना राजारामपुरीतील माउली पुतळा परिसरात थांबलेल्या २४ वर्षांच्या युवतीची दुचाकीवरून आलेल्या विवाहित तरुणाने छेड काढली. यावेळी त्याने तिच्या गालावर हात फिरवीत पलायन केले. रविवारी (दि. ११) दुपारी हा प्रकार घडला. भांबावलेल्या पीडित युवतीने बुधवारी अनोळखी तरुणाविरुद्ध राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

पीडित युवती पुणे येथे एमआयटीचे प्रशिक्षण घेते. दिवाळी सुट्टीनिमित्त ती कोल्हापुरात आपल्या आई-वडिलांकडे आली आहे. रविवारी राजारामपुरी माउली पुतळा येथे अनोळखी ४८ वर्षांच्या विवाहित तरुणाने तिची छेड काढली. या प्रकाराने ती खचली आहे.

आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर संबंधित तरुणाविरोधात तिने फिर्याद दिली. साडेपाच फूट उंच, अंगाने मध्यम, केस काळे-पांढरे, कानात ब्लू टूथ असे वर्णन असलेल्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस राजारामपुरी - माउली पुतळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: The act of the victim, the unidentified married couple on the yatra