Kolhapur: इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात नर्सिंग कॉलेजला मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 23:40 IST2025-02-25T23:40:02+5:302025-02-25T23:40:18+5:30
Kolhapur: इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नर्सिंग कॉलेज (परिचर्या प्रशिक्षण केंद्र) सुरू करण्यास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंगळवारी मान्यता दिली. याबाबत आमदार राहुल आवाडे यांनी प्रयत्न केले होते.

Kolhapur: इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात नर्सिंग कॉलेजला मान्यता
इचलकरंजी : येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नर्सिंग कॉलेज (परिचर्या प्रशिक्षण केंद्र) सुरू करण्यास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंगळवारी मान्यता दिली. याबाबत आमदार राहुल आवाडे यांनी प्रयत्न केले होते.
येथील आयजीएम रुग्णालय सन २०१६ साली शासनाकडे हस्तांतरण करण्यात आले. त्यानंतर ते पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी सुमारे सहा वर्षांचा कालावधी लागला. कोविडच्या काळात २०० खाटांचे रुग्णालय ३०० खाटांचे करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. परंतु आवश्यक वैद्यकीय अधिकारी नसल्याने अनेकवेळा रुग्णांना अन्य रुग्णालयाकडे पाठवले जाते. याबाबत तत्कालीन आमदार माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर काही विभाग सुरू करण्यात आले आहेत. आता नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्टाफ उपलब्ध होईल. त्यामुळे सेवेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.
पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णालयात घेतलेल्या आढावा बैठकीत रुग्णालयाशी संबंधित प्रश्नांची मांडणी आवाडे यांनी केली होती. त्यातील या मागणीला यश मिळाले आहे.