शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महापालिकेप्रमाणे ‘प्राधिकरणा’तील गावांसाठी विकास शुल्क आकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:58 IST

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील समाविष्ट गावातील विकास शुल्क हे ‘ड’ वर्ग महापालिकेच्या विकास शुल्काप्रमाणे आकारावे; त्यामुळे गावातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे निवेदन आमदार सतेज पाटील यांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची भेट घेऊन दिले.

ठळक मुद्देमहापालिकेप्रमाणे ‘प्राधिकरणा’तील गावांसाठी विकास शुल्क आकारावेसतेज पाटील यांची मागणी : शिवराज पाटील यांच्याशी चर्चा

कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील समाविष्ट गावातील विकास शुल्क हे ‘ड’ वर्ग महापालिकेच्या विकास शुल्काप्रमाणे आकारावे; त्यामुळे गावातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे निवेदन आमदार सतेज पाटील यांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची भेट घेऊन दिले.कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील समाविष्ट गावातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी प्राधिकरणाने ४२ गावांना नोटिसा बजावल्या आहेत. ही बांधकामे नियमित करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत कागदपत्रे प्राधिकरण कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन केले आहे.

त्याबाबत आमदार सतेज पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, प्राधिकरणांतर्गत गावातील बांधकामे नियमित करताना त्यांची दंडात्मक रक्कम ही महापालिकेच्या विकास करापेक्षा ४० टक्के जास्त असल्याचे दिसून येते. महापालिकेतील विकास परवानगीच्या अनुषंगाने जमीन शुल्क अर्धा टक्के, बांधकाम विकास शुल्क दोन टक्के इतकी आकारणी करण्यात येते.

तसेच मंजूर कोल्हापूर प्रादेशिक योजनेतील समाविष्ट क्षेत्राकरिता विकास परवानगी देण्यासाठी विकास शुल्क व बांधकाम विकास शुल्क आकारणी करण्याची तरतूद आहे. त्यामुळे ‘ड’ वर्ग महानगरपालिका परिक्षेत्रासाठी असणारे विकास शुल्क प्राधिकरण स्थिती गावांसाठी लागू करणे योग्य ठरेल. त्यामुळे प्राधिकरणामार्फत आकारण्यात येणारे शुल्क हे प्रशमन आकार, इन्फ्रास्ट्रक्चर, प्रीमिअम व इतर लागू आकार हे कोल्हापूर महापालिकेच्या तुलनेत कमीत कमी आकारावे.

नंतर सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने माफक दरात वाढवावे, अशा पद्धतीने अवलंब केल्यास प्राधिकरणाबाबत गावांतील नागरिकांकडून मिळकत विकास परवानगीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तसेच अनधिकृत विकासालाही आळा बसेल, असेही निवेदनात त्यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर