कोल्हापुरात महिलेच्या गळ्यातील ५ तोळ्यांचे गंठण हिसकावले
By Admin | Updated: May 31, 2014 01:16 IST2014-05-31T00:48:55+5:302014-05-31T01:16:54+5:30
भाजी खरेदी करून घरी जात असताना भरधाव दुचाकीस्वाराने पाच तोळ्यांचे सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची घटना आज, शुक्रवारी रात्री घडली.

कोल्हापुरात महिलेच्या गळ्यातील ५ तोळ्यांचे गंठण हिसकावले
कोल्हापूर : भाजी खरेदी करून घरी जात असताना भरधाव दुचाकीस्वाराने पाच तोळ्यांचे सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची घटना आज, शुक्रवारी रात्री घडली. याबाबतची फिर्याद संजीवनी धानय्या स्वामी (वय ४०, रा. माळी कॉलनी, टाकाळा) यांनी राजारामपुरी पोलिसांत उशिरा दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संजीवनी स्वामी या एकट्या भाजी खरेदीसाठी सायंकाळी बाहेर गेल्या. भाजी घेऊन येत असताना राजारामपुरी-टाकाळा रस्त्यावरून जाणार्या दुचाकीस्वाराने हिसडा मारून त्यांच्या गळ्यातील गंठण लांबविले. त्यांनी फिर्यादीत दुचाकीस्वार एकटा असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)