शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

‘केएमटी’ बस धडकेत बालक जागीच ठार

By admin | Updated: October 12, 2014 01:07 IST

बहीण गंभीर जखमी : सुभाषनगर येथे घरासमोरच दुर्घटना : चालकास चोप; जमावाकडून बसची तोडफोड

कोल्हापूर : सुभाषनगर कोंडाळ्याजवळ क्रिकेट खेळण्यासाठी घरातून धावत रस्त्यावर आलेल्या बहीण-भावास भरधाव केएमटी धडक दिली. त्यामध्ये ऋतुराज संजय गवळी (वय ५) याचा जागीच मृत्यू झाला; तर त्याची बहीण वैष्णवी (९) गंभीर जखमी झाली. अपघाताचे दृश्य पाहून अनेकांना कापरे भरले. दरम्यान, संतप्त जमावाने केएमटी बसची तोडफोड करीत चालक गुंगा गोपाळ जानकर (५१, रा. बांबवडे, ता. शाहूवाडी) याला बेदम चोप देत राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना आज, सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले, ऋतुराज हा बालवाडीत शिकत होता, तर वैष्णवी पहिलीत शिकते. त्यांचे वडील संजय गवळी हे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषदेसह अन्य शासकीय कार्यालयांत जाऊन बूट पॉलिशचा फिरता व्यवसाय करतात. सुभाषनगर येथील साईमंदिर कोंडाळ्याजवळ रस्त्याला लागून त्यांचे घर आहे. आज दुपारी जेवण करून ते व पत्नी झोपले होते.सायंकाळी पाचच्या सुमारास वैष्णवी व ऋतुराज क्रिकेट खेळण्यासाठी घरातून धावत बाहेर पडले. यावेळी ‘केआयटी’मार्गे मोरेवाडीहून शिरोलीकडे भरधाव जाणाऱ्या केएमटी बसने त्यांना जोराची धष दिली. यावेळी बसचे उजव्या बाजूचे पुढचे चाक ऋतुराजच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला; तर वैष्णवी फरफटत गेल्याने तिच्या डोक्याला व पाठीला जोराचा मार लागला. भरचौकात झालेला हा अपघात पाहून नागरिकांनी आरडाओरड केली. गोंधळ पाहून त्यांचे आई-वडील धावत बाहेर आले. ऋतुराजचा चेंदामेंदा झालेला पाहून दोघांनाही भोवळ आली. नागरिकांनी या दोघांना सावरत जखमी वैष्णवीला तातडीने सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले. याठिकाणी तिच्यावर प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात हलविले. काही वेळाने त्यांचे आई-वडील शुद्धीवर आले. त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, संतप्त जमावाने केएमटी बसची प्रचंड तोडफोड केली. चालक गुंगा जानकर याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अपघाताची नोंद करून चालकाला अटक केली. बॅट घेऊन आला काळ ऋतुराज व वैष्णवी नेहमी रस्त्यावर क्रिकेट खेळतात. वाहनाखाली सापडतील म्हणून त्यांच्या आईने बॅट माळ्यावर दडवून ठेवली होती. दुपारी आई झोपलेली पाहून त्यांनी वडिलांकडून बॅट खेळण्यास मागितली. ती घेऊन घराबाहेर पडताच काळाने त्यांच्यावर घाला घातला. ‘बॅट दिली नसती, तर आता माझं पोर माझ्यासोबत असतं,’ असा आक्रोश त्यांची आई ‘सीपीआर’च्या आवारात करीत होती. आजीचा अक्रोश दोघांची आजी धुण्या-भांड्याची कामे करण्यासाठी सकाळी बाहेर गेली होती. तिला शेजारील तरुणाने मोटारसायकलवरून ‘सीपीआर’मध्ये आणले. नागरिकांची गर्दी, मुलगा व सुनेचा आक्रोश पाहून तिनेही टाहो फोडला. ऋतुराजच्या मृत्यूची बातमी समजताच ती बेशुद्ध पडली. (प्रतिनिधी)