शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

केएमटीला प्रशासन, कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST

कोल्हापूर : प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे केएमटीला फटका बसत आहे, अशा शब्दात आमदार चंद्रकांत जाधव यांनी सुनावले. दर पगारावेळी ...

कोल्हापूर : प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे केएमटीला फटका बसत आहे, अशा शब्दात आमदार चंद्रकांत जाधव यांनी सुनावले. दर पगारावेळी महापालिकेवर आवलंबून राहू नका, एप्रिलपासून केएमटी स्वावलंबी करा, असे आदेशही त्यांनी दिले. शुक्रवारी त्यांनी महापालिकेच्या केएमटी वर्कशाॅपमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. प्रशासक कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर यांची प्रमुख उपस्थित होती.

आमदार जाधव म्हणाले, केएमटीतील कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी दरवेळी महापालिकेवर अवलंबून रहावे लागते, ही खेदाची बाब आहे. केएमटीचा येणारा सर्व खर्च मिळणाऱ्या उत्पन्नातूनच भागला पाहिजे. केएमटीने यासाठी उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. काही बस रिकाम्याच जाताना दिसतात. यासाठी तोट्यातील मार्ग बंद केले पाहिजेत. काही बसेसच्या वेळेत बदल केले पाहिजेत. पर्यटकांसाठी विशेष बससेवा सुरू करा. यावेळी माजी स्थायी सभापती सचिन पाटील, गटनेता शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक विनायक फाळके, अनिल कदम, उपायुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक चेतन कोंडे आदी उपस्थित होते.

चौकट

कचऱ्यापासून गॅस करून केएमटीसाठी वापरा

केएमटीच्या सर्व बसेस सीएनजी गॅसवर केल्यास तोटा कमी होऊन फायदा होईल. शहरातील कचय्रांवर प्रक्रिया करुन सीएनजी गॅस निर्मिती करून त्याचा वापर केएमटीसाठी करणे शक्य आहे. प्रशासनाने यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जाधव यांनी केली.

फोटो : २९०१२०२१ आमदार जाधव न्यूज

ओळी : कोल्हापुरातील केएमटीसंदर्भात आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी केएमटी वर्कशॉपमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, सचिन पाटील आदी उपस्थित होते.