शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

किसान पुत्र संघर्ष यात्रेचा मंगळवारी कोल्हापुरातून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:11 IST

कोल्हापूर : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ) आणि ऑल इंडिया ...

कोल्हापूर : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ) आणि ऑल इंडिया स्टुडंट्‌स फेडरेशन (एआयएसएफ) देशव्यापी आंदोलन करीत आहे. याअंतर्गत राज्यातील विविध विभागातून ‘किसान पुत्र संघर्ष’ यात्रा आयोजित केली आहे. त्याचा प्रारंभ मंगळवारी (दि. २) कोल्हापुरातून होणार आहे. यात्रेत युवक, विद्यार्थी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले, मुली सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘एआयवायएफ’चे जिल्हाध्यक्ष हरिश कांबळे आणि ‘एआयएसएफ’चे जिल्हा सचिव जावेद तांबोळी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या विभागातून एकाचवेळी मंगळवार ते शुक्रवारदरम्यान ही यात्रा निघणार आहे. यात्रेच्या माध्यमातून निघणारे सर्व जथे दि. ८ फेब्रुवारीस मुंबईत एकत्र येतील. तेथून गुजरात, राजस्थान, सिंधु बॉर्डर मार्गे दिल्लीतील आंदोलनात सहभागी होतील, असे हरिश कांबळे यांनी सांगितले.

कोल्हापूर विभागातील यात्रेचा प्रारंभ मंगळवारी सकाळी नऊ वाजता न्यू कॉलेजमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील आणि जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या उपस्थितीत होईल. तेथून शाहू समाधीस्थळ येथे अभिवादन करून यात्रा मार्गक्रमण करेल. शिंगणापूर, शिरोली, अंबपसह महामार्गालगतच्या गावांमध्ये जनजागृती करत यात्रा निघणार असून शुक्रवारी ती पुणे येथील फुलेवाड्यात पोहोचणार असल्याचे जावेद तांबोळी यांनी सांंगितले.

या पत्रकार परिषदेस आरती रेडेकर, गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, हर्षवर्धन कांबळे, केदार तहसीलदार, सुनील कोळी, योगेश कसबे उपस्थित होते.

चौकट

माहितीपट, गीतांद्वारे जनजागृती

यात्रेत माहितीपट, चळवळीची गीते याद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाईल. कोल्हापुरात ५० युवक-युवती आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची दहा मुले-मुली सहभागी होणार असल्याचे गिरीश फोंडे यांनी सांगितले.