शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

खासगी सावकारीतून दोघांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 4:53 AM

सलून व्यावसायिक व त्याच्या मित्रास जबरदस्तीने मोटारीत घालून त्यांचे अपहरण करण्याची तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली.

कोल्हापूर : खासगी सावकारकीतून कर्जाची वसुली करण्यासाठी सलून व्यावसायिक व त्याच्या मित्रास जबरदस्तीने मोटारीत घालून त्यांचे अपहरण करण्याची तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. याबाबत प्रदीप प्रकाश संकपाळ (वय २९, रा. जनाई दत्तनगर, कळंबा, कोल्हापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खासगी सावकार रोहित भाले याच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रदीप संकपाळ यांनी सलून व्यवसायासाठी रोहित भालेकडून खासगी सावकारीतून एक लाख ४० हजार रुपये घेतले होते. मूळ रक्कम व त्यावर एक लाख व्याज देण्याबाबत खासगी सावकार रोहित भाले याने संकपाळकडे तगादा लावला होता. सोमवारी रात्री भालेने संकपाळ व त्याचा मित्र प्रशांत या दोघांना फोन करून संभाजीनगर येथील शाळेजवळ बोलावून घेतले. त्यावेळी दिलेले एक लाख ४० हजार रुपये व त्यावरील एक लाख रुपये व्याज असे सुमारे दोन लाख ४० हजार रुपये दोघांनी आजच्या आज द्यावेत, अशी मागणी केली. त्यानंतर या दोघांनाही त्यांनी मित्रांच्या सहकार्याने जबरदस्तीने मोटारीत घालून कळंबा, इस्पुर्लीमार्गे मुदाळ तिट्टामार्गे आदमापूर येथे नेले. मध्यरात्री तेथे मोटार रस्त्याच्या कडेला थांबवून संकपाळ आणि प्रशांत या दोघांनाही भाले व त्याच्या तिघा मित्रांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघांनाही मोटारीतून कागलमार्गे, लक्ष्मी टेकडीमार्गे पहाटे अडीचच्या सुमारास तावडे हॉटेल चौकात आणून सोडले.