जाब विचारलेच्या रागातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 15:07 IST2019-08-31T15:04:47+5:302019-08-31T15:07:19+5:30
मोटारसायकलच्या युटिलिटी बॉक्समधील लोखंडी पाने काढत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन अज्ञात तरुणांनी अपहरण करुन केलेल्या मारहाणीत प्रदीप विलासराव देसाई (वय ४२ रा. सानेगुरूजी वसाहत) हे जखमी झाले.

जाब विचारलेच्या रागातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण
कोल्हापूर : मोटारसायकलच्या युटिलिटी बॉक्समधील लोखंडी पाने काढत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन अज्ञात तरुणांनी अपहरण करुन केलेल्या मारहाणीत प्रदीप विलासराव देसाई (वय ४२ रा. सानेगुरूजी वसाहत) हे जखमी झाले.
२४ आॅगस्टला रात्री पावनेनऊ वाजता हा प्रकार घडला. जुनाराजवाडा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, देसाई आणि त्याच्या मित्राने नवीन वाशी नाका परिसरातील एका हॉटेलसमोर मोटारसायकल पार्क केली होती. त्या वेळी दोघे अज्ञात त्यांच्या मोटारसायकलच्या युटिलिटी बॉक्समधून लोखंडी पाने काढत असल्याचे दिसले.
त्यांनी या दोघांना जाब विचारला असता शिवागीळ केली. देसाई यांना जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून देवकर पाणंद पेट्रोल पंप परिसरात नेवून मारहाण केली.