खोची विद्यामंदिर शाळा गुणवत्तेत आघाडीवर राहील - यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:22 IST2021-03-06T04:22:11+5:302021-03-06T04:22:11+5:30
खोची : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले पाहिजेत. शाळेतील वातावरण आनंदायी पाहिजे. इमारतीच्या नूतनीकरणामुळे शाळेच्या वैभवात ...

खोची विद्यामंदिर शाळा गुणवत्तेत आघाडीवर राहील - यादव
खोची : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले पाहिजेत. शाळेतील वातावरण आनंदायी पाहिजे. इमारतीच्या नूतनीकरणामुळे शाळेच्या वैभवात भर पडून शैक्षणिक प्रगती होण्यास निश्चित मदत होईल, असे प्रतिपादन शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांनी केले.
खोची येथील प्राथमिक विद्यामंदिर शाळेस भेट देऊन नूतनीकरण इमारतीची त्यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, ठेकेदार व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य वसंतराव गुरव, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय पाटील, मुख्याध्यापक वाय. सी. घाटगे आदी उपस्थित होते. ऑनलाइन शिक्षण, विद्यार्थी उपस्थिती संख्या, पोषण आहार, शिक्षकांची उपस्थिती यासंदर्भात चर्चा केली.
यावेळी पंचायत समिती सदस्य वसंतराव गुरव यांनी मार्गदर्शन केले. विरोचन शिंदे, अध्यापक प्रकाश पाटील, सुभाष गुरव, उत्तम पोळ, आनंदा कुंभार, शैलेंद्र हारोले, बी. टी. भानुसे, सुजाता पाटील, विजया कोळी, अनिल वाघ आदी उपस्थित होते.
फोटो--- खोची येथे प्राथमिक शाळेच्या नूतनीकरणाची पाहणी प्रवीण यादव यांनी केली. यावेळी पंचायत समिती सदस्य वसंतराव गुरव, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.