शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

खंडेनवमीला अंबाबाई काशी अन्नपूर्णा रूपात, नवरात्रोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 4:21 PM

शारदीय नवरात्रौत्सवात आज खंडेनवमीला कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची आदि शंकराचार्यांवर कृपा करणाऱ्या भगवती अन्नपूर्णेच्या स्वरुपात पूजा बांधण्यात आली. खंडेनवमीला आज भाविकांनी नवरात्र महोत्सवाची सांगता केली.

ठळक मुद्देखंडेनवमीला अंबाबाई काशी अन्नपूर्णा रूपातआज नवरात्र महोत्सवाचे पारणे

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात आज खंडेनवमीला कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची आदि शंकराचार्यांवर कृपा करणाऱ्या भगवती अन्नपूर्णेच्या स्वरुपात पूजा बांधण्यात आली. खंडेनवमीला आज भाविकांनी नवरात्र महोत्सवाची सांगता केली.रोजच्या धार्मिक विधीप्रमाणे सकाळी अभिषेक व दुपारची महाआरती झाल्यानंतर अश्र्विन शुद्ध नवमीला आज, अंबाबाईची आदी शंकराचार्यांनी रचलेल्या अन्नपूर्णा स्तोत्रावर आधारित भगवती अन्नपूर्णेच्या स्वरुपात पूजा बांधण्यात आली.भगवान शंकर म्हणजे वैराग्य मूर्ती. हातात रत्नखचित पात्र घेऊन जगाच्या उद्धारासाठी दारोदार भिक्षा मागणाऱ्या भगवान शंकरांनी कधीतरी आपल्या हातचं अन्न खावं ही कुठल्याही सामान्य गृहिणीप्रमाणे माता पार्वतीची अपेक्षा. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी नारदांनी तिला एक उपाय सांगितला. त्यांनी गौरीला सांगितले की काशी मध्ये कुणाचीही चूल पेटू देऊ नको, तेव्हा पार्वतीने विचारलं मग लोकांनी उपाशी रहावं का? तर नारदांनी उत्तर दिले हे मी सांगू शकत नाही, तू जगन्माता आहेस, ते तू ठरव.

केवळ शिवाला अन्न वाढायला मिळावं म्हणून पार्वती काशीच्या सर्व लोकांना, पशू-पक्षी-किटकांसह सर्वांना अन्नदान करू लागली. अखंड नगर फिरून कुठेच भिक्षा न मिळाल्याने शेवटी भगवान विश्वनाथ अन्नपूर्णेच्याच घरापुढे भिक्षा मागायला उभे राहिले. अशी किटकापासून सदाशिवापर्यंत सगळ्यांचे पोषण करणारी ही काशीपुराधीश्वरी माता अन्नपूर्णा ! तिची स्तुती करण्यासाठी आचार्यांनी एक सुंदर स्तोत्र रचले आहे.

नवमीच्या दिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई याच रूपात सजली आहे. ही पूजा केदार मुनीश्वर, प्रसाद लाटकर, रवी माईणकर आदिनाथ मुनीश्वर यांनी बांधली.

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर