खामकर गुरुजींची पुण्यतिथी साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:13+5:302021-04-05T04:21:13+5:30
तुळशी धामणी खोऱ्यातील विविध संस्थांचे संस्थापक, हरित क्रांतीचे शिल्पकार अंबाजी बाबुराव खामकर गुरुजी यांची आज पंचवीसवी पुण्यतिथी अत्यंत साधेपणाने ...

खामकर गुरुजींची पुण्यतिथी साधेपणाने
तुळशी धामणी खोऱ्यातील विविध संस्थांचे संस्थापक, हरित क्रांतीचे शिल्पकार अंबाजी बाबुराव खामकर गुरुजी यांची आज पंचवीसवी पुण्यतिथी अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. कुंभार वाडी येथील लोंडा खोरे पाणीपुरवठा संस्थेच्या प्रांगणातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिषेक करून संस्थेच्या संचालकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच धामोड येथील सह्याद्री हायस्कूलच्या आवारातील पुतळ्याचे पूजन सेवानिवृत्त शिक्षक एस. डी. शिवलंगण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन हिंदुराव खामकर, माजी सभापती जयसिंग खामकर, जिल्हा परिषद कोल्हापूरचे शिक्षण विस्ताराधिकारी डी. सी. कुंभार, शंकर सुतार, भाऊ मगर, पंडित गुरव, कृष्णात कुंभार, मारुती कुंभार, विष्णू कांबळे , नामदेव कुंभार, मनोहर ऱ्हायकर, प्राचार्य एस. एल. उगारे, एस. बी. पाटील, के. बी. पाटील, सुभाष खामकर, के. एल. बोरनाक, एस. एस. कांबळे यांचासह प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळी= कुंभारवाडी (ता. राधानगरी ) येथील खामकर गुरुजींच्या पुतळ्याचे पूजन करताना मान्यवर
छाया -श्रीकांत ऱ्हायकर