शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
5
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
6
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
7
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
8
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
9
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
10
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
11
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
12
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
13
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
14
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
15
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
16
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
17
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
18
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
19
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
20
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला

Kolhapur flood: कोल्हापुरातील पाच रुग्णालयांना स्थलांतरचे आदेश, ३० निवारा केंद्रे स्थापन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:08 IST

शहरात ४० नागरिकांचे स्थलांतर

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील पूरबाधित क्षेत्रातील पाच रुग्णालयांना रुग्ण स्थलांतरित करण्यासंदर्भात नोटिसा देण्यात आल्या आहेत.नागाळा पार्क, महावीर कॉलेज परिसरातील डायमंड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस (विन्स) हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, तसेच कदमवाडी येथील ॲपल सरस्वती हॉस्पिटल या पाच रुग्णालयांना या नोटिसा देण्यात आल्या आहेत.यापूर्वी २०१९ व २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे या रुग्णालयापर्यंत पाणी आले होते. महापूर आल्यानंतर ऐनवेळी रुग्ण व रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली होती, तसेच महापालिका अग्निशमन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. हा अनुभव लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाला या नोटिसा दिल्या आहेत. प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी पंचगंगा नदीची वाढती पाणीपातळी लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्या रुग्णालयांना निघाल्या नोटिसा..डायमंड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस (विन्स) हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, ॲपल सरस्वती हॉस्पिटल

शहरात ४० नागरिकांचे स्थलांतर, ३० निवारा केंद्रे स्थापन कोल्हापूर : जिल्ह्यात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याने संभाव्य महापूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी दसरा चौक येथील सुतारवाडा परिसरातील ४० नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. या सर्वांची राहण्याची सोय चित्रदुर्ग मठात करण्यात आली आहे.महापालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, एकूण ३० निवारा केंद्रे उभारण्यात आले असून, या ठिकाणी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार आरोग्य सेवेची सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी या सुविधांची पाहणी पाहणी करून योग्य सूचना दिल्या.या निवारा केंद्रात आरोग्य तपासणी व वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी महापालिकेने दोन सहायक नियंत्रण अधिकारी आणि ३७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या आरोग्य पथकाचे नियंत्रण अधिकारी म्हणून आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, तर नोडल ऑफिसर म्हणून डॉ. अमोलकुमार माने काम पाहणार आहेत. आवश्यकतेनुसार सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडून इंटर्न डॉक्टरांचीही मदत घेतली जाणार आहे.गरोदर मातांची काळजीविशेषतः गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना योग्य औषधोपचार देण्याची तर गंभीर स्थितीतील रुग्णांना तातडीने पुढील उपचारासाठी हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे व वॉर्ड दवाखान्यांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने निवारा छावण्यांमध्ये दैनंदिन आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. महापालिका भांडार विभागाकडून पर्याप्त औषधसाठा करून ठेवण्यात आला आहे.