आयुक्त कलशेट्टी म्हणाले - शहरात येणाऱ्यांवर कडक नजर ठेवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 02:20 PM2020-05-02T14:20:52+5:302020-05-02T14:23:26+5:30

कोल्हापूर  : ‘लॉकडाऊन’काळात नागरीकांना स्थलांतरास परवानगी दिल्यामुळे पुढील काळात बाहेर गावांहून येणाºया व्यक्तींवर कडक नजर ठेवा, अशा सूचना आयुक्त ...

Keep a close eye on those coming to the city, Commissioner Kalshetti | आयुक्त कलशेट्टी म्हणाले - शहरात येणाऱ्यांवर कडक नजर ठेवा 

आयुक्त कलशेट्टी म्हणाले - शहरात येणाऱ्यांवर कडक नजर ठेवा 

Next
ठळक मुद्देआयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या सूचना

कोल्हापूर  : ‘लॉकडाऊन’काळात नागरीकांना स्थलांतरास परवानगी दिल्यामुळे पुढील काळात बाहेर गावांहून येणाºया व्यक्तींवर कडक नजर ठेवा, अशा सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शनिवारी कोअर कमिटीच्या आढावा बैठकीत सर्व संबंधित अधिकारी तसेच प्रभाग समिती सचिव व अध्यक्षांना दिल्या. 
प्रत्येक प्रभागातील समितीच्या सचिवांनी आपल्या भागात असणाºया अपार्टमेंट, हौसिंग सोसायटी, गावठाण मधील तरुण मंडळे यांच्या अध्यक्षांचे नांव व मोबाईल क्रमांक संकलीत करावेत,आपल्या सोसायटी मध्ये नवीन कोणी व्यक्ती परगावाहून आल्यास तात्काळ सूचना द्याव्यात, कोणी एखादा व्यक्ती आली असल्यास ती सीपीआरला जाऊन तपासणी करुन आली आहे का? त्यास होम कॉरंटाईन केले आहे का? घरातून बाहेर पडून फिरते का? याबाबत दक्षता घ्या,  सचिवांनी प्रभागातील किती लोक होम कॉरंटाईन व किती लोक अलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले आहेत याबाबतचा संपूर्ण डाटा  महापालिकेत स्थापन करण्यात आलेल्या वॉर रुममध्ये एकत्रीत करुन संकलीत करावा, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.  
 

Web Title: Keep a close eye on those coming to the city, Commissioner Kalshetti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.