केडीसीसी बँकेकडे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ३३ कोटींच्या ठेवी

By विश्वास पाटील | Updated: October 22, 2025 19:41 IST2025-10-22T19:41:36+5:302025-10-22T19:41:49+5:30

बँकेच्या ठेव योजनांना ठेवीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

KDCC Bank has deposits worth 33 crores on the occasion of Diwali Padwa | केडीसीसी बँकेकडे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ३३ कोटींच्या ठेवी

केडीसीसी बँकेकडे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ३३ कोटींच्या ठेवी

विश्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विविध ठेव योजनांमध्ये ३३ कोटींच्या ठेवी जमा झाल्या. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी ही माहिती दिली. बँकेच्या सर्वच ठेव योजनांना ठेवीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.
          
याबाबत माहिती अशी, केडीसीसी बँकेने बुधवारी दि. २२ रोजी दिपावली पाडव्याच्या दिवशीही ठेवी स्वीकारण्यासाठी बँकेच्या केंद्र कार्यालयातील मुख्य शाखेसह सर्व म्हणजे १९१ शाखा सुरू ठेवल्या होत्या. बँकेकडे सुरू असलेल्या सर्वच ठेव योजनांना चांगल्या व्याजदरामुळे ठेवीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ बँकेचे अध्यक्ष आहेत..महाराष्ट्रातील भक्कम आर्थिक स्थिती असलेली ही प्रमुख जिल्हा मध्यवर्ती बँक आहे..
                  
उद्दिष्ट रु. १२ हजार कोटी ठेवींचे...! केडीसीसी बँकेने दि. ३१ मार्च २०२५ अखेर रू. १०, ६३५ कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पार केलेला आहे. चालू आर्थिक वर्षाअखेर बँकेचे रू. १२, ००० कोटी ठेवींचे उद्दिष्ट आहे.

Web Title : दीपावली पाड़वा पर केडीसीसी बैंक में ₹33 करोड़ जमा

Web Summary : दीपावली पाड़वा पर कोल्हापुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक को विभिन्न योजनाओं में ₹33 करोड़ जमा हुए। बैंक की शाखाएं खुली रहीं, जिससे आकर्षक ब्याज दरों के कारण अच्छी रुचि मिली। केडीसीसी का लक्ष्य मार्च 2025 तक ₹12,000 करोड़ जमा करना है।

Web Title : KDCC Bank Sees ₹33 Crore Deposits on Diwali Padwa

Web Summary : Kolhapur District Central Cooperative Bank received ₹33 crore in deposits across various schemes on Diwali Padwa. The bank's branches remained open, attracting significant interest due to competitive interest rates. KDCC aims for ₹12,000 crore in deposits by March 2025.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.