शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास नकार दिला म्हणून केला खून, 'ती'च्या तीन मुलांसह आजी बनली निराधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 17:20 IST

कविताच्या अचानक जाण्याने तीन मुलं, सासू एकाकी पडली आहेत. त्यांना या घटनेचा धक्का बसला आहे.

रमेश साबळेकसबा तारळे : आईचा झालेला खून.. चार वर्षांपूर्वी दुर्धर आजारांने वडिलांचे तर मायेचं छत्र देणार्‍या आजोबांचे दहा वर्षांपूर्वी झाल्याने  निराधार झालेल्या दोन मुली, एक मुलगा तसेच वयोवृद्ध आजी या चार वर्षांपूर्वी सुखवस्तू जीवन जगणाऱ्या जाधव कुटुंबांला आता समाजाच्या मायेची, आधाराची गरज आहे.घडलं ते असे, भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथील  नारायण जाधव हे मुंबईतील एका कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. स्वतः नारायण जाधव पत्नी तानुबाई, मुलगा प्रमोद आणि दोन मुली या पाच माणसांच्या कुटुंबासह ते येथे राहावयास आले.त्यानंतर मुलगा प्रमोद याचा विवाह २००० साली खिंडी व्हरवडे येथील कविताशी झाला. यादरम्यान वडिलांनी प्रमोद याला गावातच इलेक्ट्रिकलचे दुकान घालून दिले. या व्यवसायात प्रमोदने अल्पावधीतच चांगला जम बसविला. निवृत्तीनंतर नारायण, तानुबाई यांचे व मुलाचे सर्व काही व्यवस्थित असतानाच सुखी संसारात मिठाचा खडा पडावा तसे घडले. नारायण यांना शारीरिक व्यंग येत मृत्यू झाला आणि प्रमोद व्यसनाच्या आहारी गेला. चांगला  चालत असलेला इलेक्ट्रिक व्यवसाय आतबट्ट्यात आला. चार वर्षांपूर्वी त्याचे कॅन्सरने निधन झाले.सासर्‍याच्या पाठोपाठ नवऱ्याच्या निधनामुळे हतबल आणि एकाकी पडलेल्या कविताने सर्व संकटांना धीराने सामोरे जात आपल्या टेलरिंग व्यवसायात जम बसवला. थोरली मुलगी गीताली हीला बारावीनंतर महागाव (गडहिंग्लज) येथील डी फार्म्ससीला दोन वर्षांपूर्वी घातले. दोन नंबरची मुलगी श्रुती (वय१६) दहावीत तर मुलगा साहिल(वय १३)पाचवीत शिक्षण घेत आहे. कविताच्या अचानक जाण्याने तीन मुलं, सासू एकाकी पडली आहेत. त्यांना या घटनेचा धक्का बसला आहे. आज संपूर्ण दिवसभर तिन्ही मुलं आजीच्या कुशीत कावरीबावरी होऊन बसली होती. सेवाभावी संस्था समाजातील दानशूर व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन एका उद्ध्वस्त कुटूंबाला धीराबरोबरच आधार देण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर