कोल्हापूरच्या कथक नृत्यांगना विदुषी मंगला भट्ट यांचे निधन

By विश्वास पाटील | Updated: June 16, 2025 18:10 IST2025-06-16T18:09:55+5:302025-06-16T18:10:48+5:30

संगीत नाटक अकादमी पुरस्काराने झाला होता सन्मान

Kathak dancer Vidushi Mangala Bhatt passes away | कोल्हापूरच्या कथक नृत्यांगना विदुषी मंगला भट्ट यांचे निधन

कोल्हापूरच्या कथक नृत्यांगना विदुषी मंगला भट्ट यांचे निधन

कोल्हापूर: संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित विदुषी मंगला भट्ट यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी अल्पशा आजाराने हैदराबाद येथे आज, सोमवारी (दि.१६) निधन झाले. मूळच्या त्या कोल्हापूरच्या होत्या.

पूर्वाश्रमीच्या मंगला कुलकर्णी यांनी दिल्ली कथक केंद्रामध्ये पंडित दुर्गालालजी यांच्याकडून कथकचे धडे घेतले. मंगलाताईंनी देश-विदेशामध्ये अनेक महोत्सवांमध्ये आपल्या कथक नृत्यप्रतिभेच्या अविष्कार सादर केला. प्रतिभावंत नृत्यांगना म्हणून त्यांचा नावलौकिक होता. हैदराबाद येथील त्यांच्या आकृती कथक केंद्रासोबतच वेळोवेळी परदेशात राहून कथकच्या प्रशिक्षणाचे तसेच प्रचार- प्रसाराचे कार्य केले. 

केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कारासोबतच तेलंगणा, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातील महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता. मंगलाताई कोल्हापूरशी असलेले ऋणानुबंध जपण्यासाठी गेली काही वर्षे गार्गीदेवी निंबाळकर यांच्या माध्यमातून कथकचे प्रशिक्षण देत होत्या. पंडित बिरजू महाराज यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित राघवराज भट्ट हे त्यांचे पती आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि सून आहे. 

Web Title: Kathak dancer Vidushi Mangala Bhatt passes away