शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

कासारवाडीचे पाणी वनीकरणने अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

सतीश पाटील शिरोली : कासारवाडी (ता. हातकणंगले) गावची राष्ट्रीय पेयजल योजना सामाजिक वनीकरणाच्या नियमात अडकल्याने या योजनेचे शिये कासारवाडी ...

सतीश पाटील शिरोली : कासारवाडी (ता. हातकणंगले) गावची राष्ट्रीय पेयजल योजना सामाजिक वनीकरणाच्या नियमात अडकल्याने या योजनेचे शिये कासारवाडी मुख्य पाइपलाइनचे काम बंद पाडले आहे. कासारवाडी गावची लोकसंख्या २२५० आहे. गावच्या तिन्ही बाजूंनी डोंगर; पण गावाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. पिण्याचे पाणी दोन दिवसातून एकदा वाघजाई गाव विहिरीतून येते. पाऊस संपला की गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सन २०१९ मध्ये जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ९८ लाखांची योजना मंजूर केली. या कामाचा ठेका इस्लामपूर येथील इनामदार या ठेकेदारांना मिळाला आहे. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. शिये गावच्या हद्दीत पंचगंगा नदीशेजारी जागा घेऊन तेथून पाइपलाइन आणली आहे; पण ही पाइपलाइन कासारवाडी येथील वनीकरण विभागाच्या हद्दीत आल्याने त्यांनी काम अडविले आहे. त्यामुळे या योजनेचे काम थांबले आहे. हे काम पुन्हा सुष करण्यासाठी वनीकरण विभागाच्या नागपूर कार्यालयाची परवानगी आवश्यक आहे; पण ही परवानगी मिळवण्यासाठी अनेक परवाने आणि कागदपत्रे गोळा करावी लागणार असल्याने त्यासाठी एक कन्सल्टंट नेमावा लागणार आहे. त्याचा खर्चही एक लाखापेक्षा जास्त आहे. हा खर्च कोण करणार, हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कासारवाडीकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

कोट : कासारवाडी गावच्या पेयजल योजनेअंतर्गत गावातील कामे सुरू आहेत. वनीकरण विभागाच्या हद्दीत पाइपलाइन टाकण्यास मंजुरी मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ही मंजुरी लवकरच मिळेल आणि योजना पूर्ण होईल. मनीषा माने, जिल्हा परिषद सदस्या

कोट : कासारवाडीची पाणीयोजना वनीकरणाच्या नियमात अडकली असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर काम सुरू करू शकतो. सध्या या जागेतील काम बंद आहे. विनापरवाना काम केले तर वनीकरण विभागात कारवाई करून मशिनरी जप्त करू शकतात.

जुबेर इनामदार, ठेकेदार.

पेयजल योजनेचा नवीन प्रस्ताव तयार करण्यासाठी कन्सल्टंट नेमावा लागणार आहे. यासाठी सुमारे एक लाखापेक्षा जास्त खर्च आहे. हा खर्च ग्रामपंचायत करू शकत नाही, असे ठेकेदाराला सांगितले आहे. प्रभाकर परीट, ग्रामविकास अधिकारी