शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कासारपुतळेतील जवान प्रमोद पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 18:00 IST

दत्ता लोकरे सरवडे : अपघातात जखमी झालेल्या कासारपुतळे ता. राधानगरी येथील जवान प्रमोद विश्वास पाटील (वय ३५) यांची मृत्यूशी ...

दत्ता लोकरेसरवडे : अपघातात जखमी झालेल्या कासारपुतळे ता. राधानगरी येथील जवान प्रमोद विश्वास पाटील (वय ३५) यांची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली. त्यांच्यावर कोल्हापुरातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल, मंगळवारी रात्री (दि.३१ डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. गावासह पंचक्रोशीतील महिला, ग्रामस्थांनी जवान प्रमोद पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. आयटीबीएफच्या जवानांनी प्रत्येकी तीन फायर झाडून त्यांना मानवंदना दिली.प्रमोद पाटील हा सन २०११ साली इंडो तिबेटियन बाँर्डर पोलिस फोर्स  (आयटीबीएफ) मध्ये भरती झाला होता. त्यांने मिझोराम, अरुणाचल प्रदेश सिमेवर सेवा बजावली होती. सध्या तो उतराखंड येथे सेवा बजावत होता. दसरा सण दरम्यान प्रमोद हा एक महिना सुट्टीसाठी गावी आला होता. १३ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर -गारगोटी रोडवर क्रेशरकडे जाणाऱ्या वळणावर  अपघात होऊन त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्यांच्यावरती गेले तीन महिने कोल्हापूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली अन् त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी मृतदेह कोल्हापूर येथून मुदाळतिट्टा येथे नंतर बेळगावहून आलेल्या आयटीबीएफच्या वाहनाने मृतदेह गावी आणण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. "प्रमोद पाटील अमर रहे, "भारत माता की जय "अशा घोषणा देण्यात आल्या. आयटीबीएफचे अधिकारी मंगेश यादव व टीम ४४ बीएन यांनी प्रत्येकी तीन फायर करत मानवंदना दिली. पोलीस निरीक्षक डी. एन. देशमुख व सरपंच सुनीता पोवार, विक्रमसिंह आबीटकर, सरपंच रणधिरसिंह मोरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून जवानास श्रद्धांजली वाहिली. पाच वर्षाच्या समर्थने वडिलांच्या मृतदेहास भडाग्नी दिला.  त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा समर्थ आणि तीन महिन्याची मुलगी चतुर्थी असा परिवार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीAccidentअपघातDeathमृत्यू