शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

करवीरकन्या कस्तुरी सावेकर एव्हरेस्टवर तिरंगा फडकविणार । कोल्हापुरातून एकमेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:59 AM

२४ मार्च रोजी ती कोल्हापुरातून प्रस्थान करणार असून, २८ रोजी प्रत्यक्ष चढाईला सुरुवात करणार आहे. ४० ते ६० डिग्री तापमानात तिला चढाई करावी लागणार आहे; कारण तेथे नियमित १५० ते २०० किलोमीटर वेगाने वारा वाहतो. या टप्प्यात दोन डेथ झोन आहेत.

ठळक मुद्दे रोज बारा तास सराव

संदीप आडनाईक ।कोल्हापूर : ती एकुलती एक. वय अवघे १८ वर्षे. वडील मेकॅनिक; पण वयाच्या तिसऱ्या वर्षापासून १३७ सह्याद्रीतील दरीकपारी तुडवित कोल्हापूरची कस्तुरी दीपक सावेकर मार्च महिन्यात जगातील सर्वोच्च अशा माउंट एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा ध्वज रोवण्याची जिद्द बाळगून रोज बारा तास अथक सराव करत आहे.

मंगळवार पेठेतील कस्तुरी चाटे ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सची बारावीची विद्यार्थिनी आहे. आर्मी आॅफिसर होण्याचा मनोदय असलेल्या कस्तुरीला सहावीत असल्यापासूनच जगातील सर्वांत उंच शिखर माउंट एव्हरेस्टची (उंची २९ हजार २८ फूट) ओढ होती. शिक्षणात गॅप घेऊन यंदा ती फेब्रुवारीपासून रोज बारा तास सराव करत आहे. ७० दिवसांच्या या मोहिमेसाठी ४२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. २४ मार्च रोजी ती कोल्हापुरातून प्रस्थान करणार असून, २८ रोजी प्रत्यक्ष चढाईला सुरुवात करणार आहे. ४० ते ६० डिग्री तापमानात तिला चढाई करावी लागणार आहे; कारण तेथे नियमित १५० ते २०० किलोमीटर वेगाने वारा वाहतो. या टप्प्यात दोन डेथ झोन आहेत. दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदत केल्यास हा पहिलाच धाडसी प्रयत्न पूर्णत्वास जाणार आहे. तिच्यासोबत महाराष्ट्रातील सहाजण सहभागी होणार आहेत.

यांचे आहे सहकार्यतिच्या या मोहिमेत कोल्हापूरच्या करवीर हायकर्स आणि पुण्याच्या गिरिप्रेमी गिर्यारोहण संस्थेने संपूर्ण तांत्रिक सहकार्य देऊ केले आहे. प्राणायाम, योगासाठी वीणा मालदीकर, जीमसाठी आनंदा डाकरे आणि विजय मोरे, सायकलिंगसाठी अनिल भोसले, विक्रम कुलकर्णी, किशोर कारंडे हे प्रशिक्षक सज्ज आहेत. तसेच जलतरणसाठी, आठवड्यातून एक दिवस कुशिरे ते जोतिबा आणि परत असे ६० किलोमीटरचे अंतर पाठीवर २५ किलोचे वजन घेऊन ती धावत पार करते. एव्हरेस्टवरील वातावरणात आॅक्सिजनसह ३५ किलो वजन पेलावे लागणार आहे, त्याची तयारी ती करत आहे.

प्रशिक्षण आणि पुरस्कार

कस्तुरीने यशस्वीकेलेल्या मोहिमाकातळधार धबधबा रॅपलिंग, कळसुबाई, गोरखगड, सिद्धगड, प्रतापगड, कलावंतीणीचा सुळका, साल्हेर, सालोटा, मोरामुल्हेर, हरगड, नळीची वाट, लिंगाणा, कळकराय सुळका, हरिश्चंद्रगड, किल्ले अलंग मदन, कुलंग, तर हिमालयातील डॉ. बी. सी. राय पीक (उंची १८ हजार फूट), क्षितिदार बेस कॅम्प (उंची १५ हजार ७०० फूट), संदकफू शिखर (११९२९ फूट), विशाळगड येथे झीप लाईन व्हॅली क्रॉसिंग, विशेष म्हणजे एप्रिल नेपाळमधील माउंट मेरा पीक (उंची २१ हजार २४६ फूट) ही मोहीम तिने १२ दिवसांत पूर्ण केली आहे.

 

2017हिमालयीन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंग येथे तीन सुवर्णपदके, युथ इन्स्पिरेशनल अवॉर्ड

2018'मनाली येथे मूलभूत, परिपूर्ण प्रशिक्षण

टॅग्स :kolhapurकोल्हापूर