शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Kolhapur: अंबाबाई मूर्तीची तज्ञांकडून दोन तास बारकाईने पाहणी, उद्या पुन्हा होणार तपासणी 

By इंदुमती सूर्यवंशी | Published: March 14, 2024 1:45 PM

अहवाल न्यायालयाला सादर करणार

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची गुरुवारी पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगिराज यांनी पाहणी केली. तब्बल दोन तासाहून अधिक काळ केलेल्या या पाहणी दरम्यान त्यांनी मूर्तीच्या चेहऱ्यावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. आज शुक्रवारी पून्हा ते मूर्तीची पाहणी करणार आहेत. दरम्यान त्यांनी मूर्तीच्या सध्यस्थितीवर भाष्य करणे टाळत आम्ही न्यायालयात अहवाल सादर करू असे सांगितले.श्री अंबाबाई मूर्तीची प्रचंड झीज झाल्याने ती सध्या नाजूक स्थितीत आहे. मूर्तीचे संवर्धन केले जावे यासाठी श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता, तसेच मूर्तीची स्थिती नेमकी कशी आहे हे पाहण्यासाठी त्यात पुरातत्व विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जावी अशी मागणी केली होती.न्यायालयाने ही मागणी मान्य केल्यानंतर गुरुवारी सकाळी ७ वाजता पुरातत्व’चे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगिराज यांनी मूर्तीची पाहणी सुरू केली. साडे नऊ वाजेपर्यंत ही पाहणी चालली. या दरम्यान त्यांनी मूर्तीच्या चेहऱ्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. तसेच संपूर्ण मूर्तीची स्पंजिंग करण्याआधी आणि स्पंजिंग केल्यानंतर अशा दोन टप्प्यांमध्ये पाहणी केली. तसेच मोबाईलवर व्हिडिओ व छायाचित्रे घेतली.दरम्यान पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता आज शुक्रवारीदेखील आम्ही मूर्तीची पाहणी करणार असून आमचा अहवाल न्यायालयाला सादर करू असे सांगितले. त्यांनी मूर्तीची सध्यस्थिती कशी आहे यावर भाष्य करणे टाळले. यावेळी श्रीपूजक गजानन मुनिश्वर, लाभेश मुनिश्वर, अजिंक्य मुनिश्वर देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे विधी सल्लागार ॲड. वैभव इनामदार, पुरातत्व विभागाचे उत्तम कांबळे, ॲड. प्रसन्न मालेकर, दिलीप देसाई उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर