शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

रूपांतरित कर भरण्यावरून शिवसेनेकडून करवीर प्रांताधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:11 IST

Shiv sena koalhapur- व्यापाऱ्यांना रूपांतरित कराच्या भरणा करण्यापोटी पाठवलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करू, असा इशारा देत सोमवारी शिवसेनेने करवीर प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांना धारेवर धरले. सक्ती नसल्याचा खुलासा दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. या आक्रमक आंदोलनामुळे काहीकाळ कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ठळक मुद्देरूपांतरित कर भरण्यावरून शिवसेनेकडून करवीर प्रांताधिकारी धारेवरसक्ती नसल्याच्या खुलाशानंतर आंदोलन मागे

कोल्हापूर : व्यापाऱ्यांना रूपांतरित कराच्या भरणा करण्यापोटी पाठवलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करू, असा इशारा देत सोमवारी शिवसेनेने करवीर प्रांताधिकारी वैभव नावाडकर यांना धारेवर धरले. सक्ती नसल्याचा खुलासा दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. या आक्रमक आंदोलनामुळे काहीकाळ कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले.कोल्हापूर शहरातील १७ हजार व्यापाऱ्यांना करवीर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून रूपांतरित कर भरणा करा, अन्यथा ४० पट दंडाच्या शिक्षेला तयार राहा, अशा नोटिसा पाठविल्या आहेत. यावरून व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

यावरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यामागील करवीर प्रांत कार्यालयात जाऊन आंदोलन केले.

यावेळी व्यापारी महापालिकेच्या घरफाळ्यासह अन्य करही नियमितपणे भरणा करत असल्याचे निदर्शनास आणून देताना पवार यांनी प्रांताधिकारी नावाडकर यांना दरवर्षी रूपांतरित कराचे भूत व्यापाऱ्यांच्या मानगुटीवर का बसवता अशी विचारणा केली.

या आंदोलनात शिवसेनेचे हर्षल सुर्वे, संजय जाधव, सुजित चव्हाण, राजेंद्र पाटील, राजू जाधव, शशी बिडकर, प्रदीप हांडे, तानाजी आंग्रे, संदीप घाटगे यांनी सहभाग घेतला.

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर