शहरं
Join us  
Trending Stories
1
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
2
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
3
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
4
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
5
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
6
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
7
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
8
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
9
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
10
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
11
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
12
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
13
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
14
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
15
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
16
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
17
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
18
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
19
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
20
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: 'करवीर पंचायत समिती' पतसंस्थेतील अपहाराचा आकडा गेला २४ कोटींवर, संशयित आरोपी मोकाटच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:04 IST

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास वर्ग

कोल्हापूर : करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील अपहाराचा आकडा २४ कोटी ६९ लाख ५३ हजार रुपयांवर पोहोचला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी हा तपास लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला. पतसंस्थेचे तत्कालीन पदाधिकारी, कर्मचारी आणि लेखापरीक्षकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती ठेवीदारांनी दिली.करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने १३ कोटी २८ लाखांचा अपहार केल्याचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून पतसंस्थेच्या कारभाराचे प्रभारी विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी फेर लेखापरीक्षण केले. त्यात फसवणुकीची व्याप्ती वाढल्याचे स्पष्ट झाले. ४४८ ठेवीदारांची २४ कोटी ६९ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लेखापरीक्षणात समोर आले.संस्थेतील तत्कालीन पदाधिकारी, संचालक मंडळ आणि लेखापरीक्षक अशा ३४ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला असून, उपअधीक्षक सुवर्णा पत्की अधिक तपास करीत आहेत. याबाबत ५६ ठेवीदारांनी ग्राहक न्यायालयात दावे दाखल केले आहेत, अशी माहिती ठेवीदार फिर्यादी सुबराव रामचंद्र पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

अपहाराचा तपशील असा

  • रोख रक्कम अपहार : ४८ लाख ९९ हजार
  • जिल्हा बँक लक्ष्मीपुरी शाखेत बनावट नोंदी करून : ४५ लाख
  • जिल्हा बँक लक्ष्मीपुरी शाखेत धनादेश व्यवहारात फसवणूक : ६८ लाख
  • नियमित कर्जात : १ कोटी ९० लाख
  • आकस्मित कर्ज : ७ लाख ९९ हजार
  • तारण कर्ज : ९ लाख ७१ हजार
  • इर्शाद अल्लाबक्ष देसाई यांच्याशी संगनमत करून १५ लाख ७१ हजार
  • पांडुरंग परीट यांनी उचल केलेली : १७ लाख ४५ हजार
  • दामदुप्पट ठेव तारण कर्ज : २ लाख ८५ हजार
  • दामदुप्पट ठेवी : ८४ लाख
  • दामदुप्पट ठेवी जमा नसताना अदा : १७ लाख ८२ हजार
  • कॉल ठेवी : १० कोटी ५ लाख
  • कॉलठेवी जमा नसताना अदा : ८ कोटी
  • कॉलठेवी जमा नसताना अदा : ९२ लाख
  • शुभम उल्हास लोखंडे : ३० लाख ८७ हजार
  • वीर हनुमान दूध संस्था कुरुकली : ५ लाख
  • व्यवस्थापक पांडुरंग आण्णाप्पा परीट यांच्याकडून जमा नसलेली ठेव उचल : २३ लाख ६४ हजार
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Co-op Society Scam Exceeds ₹24 Crore; Accused Still Free

Web Summary : The Karveer Panchayat Samiti Co-operative Credit Society scam in Kolhapur has surpassed ₹24 crore. The investigation has been transferred to the Economic Offences Wing. Thirty-four individuals, including officials and auditors, are implicated. Depositors have filed claims in consumer court.