शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Elections -हवा कॉँग्रेसची; भाजपपुढे खडतर आव्हान अथणी मतदारसंघ : लक्ष्मण सवदी, महेश कुमठळ्ळी यांच्यात जोरदार चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:14 IST

अथणी : कर्नाटकचे माजी मंत्री, भाजपचे नेते लक्ष्मण सवदी अथणी विधानसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. मात्र, यावेळी कॉँग्रेसचे उमेदवार महेश कुमठळ्ळी यांनी त्यांच्यापुढे खडतर आव्हान

चंद्रकांत कित्तुरे ।अथणी : कर्नाटकचे माजी मंत्री, भाजपचे नेते लक्ष्मण सवदी अथणी विधानसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. मात्र, यावेळी कॉँग्रेसचे उमेदवार महेश कुमठळ्ळी यांनी त्यांच्यापुढे खडतर आव्हान उभे केले आहे. मतदारसंघात काँग्रेसची हवा दिसत असली तरी पारंपरिक मतपेटीच्या जोरावर आपला विजय निश्चित असल्याचा किंबहुना गतवेळपेक्षा यावेळी मताधिक्य वाढण्याचा विश्वास सवदी आणि त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

अथणी मतदारसंघात ११ उमेदवार रिंगणात आहेत. यातील लक्ष्मण सवदी यांनी यापूर्वी भाजपच्याच उमेदवारीवर विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. यावेळी ते चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एक वजनदार नेते म्हणून भाजपमध्ये त्यांचे नाव आहे. राज्यात भाजप सरकारच्या कार्यकालात त्यांना सहकारमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करीत त्यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. आंबेडकर भवन उभारणी, कोकटनूर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय, गोरगरिबांना घरे, उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून कृष्णा नदीतून पाच टीएमसी पाणी आणणे ही काही त्यांची महत्त्वाची कामे म्हणून सांगता येतील.

कॉँग्रेसचे महेश कुमठळ्ळी हे गतवेळच्या निवडणुकीत सवदी यांचे प्रतिस्पर्धी होते. २३७७१ इतक्या मताधिक्क्याने त्यांचा पराभव झाला होता; मात्र या पराभवाने खचून न जाता त्यांनी मतदारसंघातील जनसंपर्क कायम ठेवत जनतेची कामे केली आहेत. त्यामुळे यावेळी नव्या जोमाने ते पुन्हा सवदी यांच्याविरोधात रिंगणात उतरले आहेत. सवदी यांनी सुरुवातीच्या काळात विकासकामे केली; मात्र गेल्या पाच वर्षांत त्यांचे मतदारांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जनतेत त्यांच्याबाबत नाराजी आहे. याचा फायदा कॉँगेसला होणार आहे.

महेश कुमठळ्ळी यांचा विजय निश्चित आहे, असा दावा कुमठळ्ळी यांचे बंधू मृगेश यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. येथे निधर्मी जनता दलाचे गिरीश बुटाली हे तिसरे उमेदवारही स्पर्धेत आहेत. मात्र, ते कुणाची किती मते खाणार यावरच विजयाचे पारडे कुणाकडे झुकणार हे ठरणार आहे. याशिवाय येथे लिंगायत त्याखालोखाल जैन आणि इतर असे मतदारांचे जातीय समीकरण आहे. ते निकालात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 

‘एक व्होट, एक नोट’काँग्रेसचे उमेदवार महेश कुमठळ्ळी आणि त्यांचे कार्यकर्ते हे मतदारांकडे मताबरोबरच प्रचारासाठी देणगी देण्याचे आवाहनही करीत आहेत. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मतदारसंघात कॉँग्रेससाठी ‘एक व्होट, एक नोट’ची चर्चा चालू आहे.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर