Karnatak : महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 19:55 IST2020-06-02T19:39:40+5:302020-06-02T19:55:08+5:30
अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला. कर्नाटक सरकारच्या कार्यदर्शीनी आज हा आदेश काढला. अथणीचे आमदार महेश कुमटहळी हे यापूर्वी निगम महामंडळाचे अध्यक्ष होते.

Karnatak : महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा
बेळगांव : अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला.
कर्नाटक सरकारच्या कार्यदर्शीनी आज हा आदेश काढला. अथणीचे आमदार महेश कुमटहळी हे यापूर्वी निगम महामंडळाचे अध्यक्ष होते.
कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. २०१८ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते कॉँग्रेसचे उमेदवार होते. महेश कुमठळ्ळी त्यापूर्वीच्या निवडणुकीत सवदी यांचे प्रतिस्पर्धी होते.
२३७७१ इतक्या मताधिक्क्याने त्यांचा पराभव झाला होता; मात्र या पराभवाने खचून न जाता त्यांनी मतदारसंघातील जनसंपर्क कायम ठेवत जनतेची कामे केली. दरम्यान , भाजपने त्यांना तिकीट दिल्याने ते नव्या जोमाने ते पुन्हा रिंगणात उतरले होते.