शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: लिंक ओपन केली अन् फसले; कराडच्या व्यवसायिकाला ६.६९ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:50 IST

दोघांवर जयसिंगपुरात गुन्हा दाखल

जयसिंगपूर : शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवून ६ कोटी ६९ लाख ८१ हजारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अज्ञातांवर सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद औषध व्यावसायिक अजय नंदकिशोर भट्ट (वय ५२, रा. शनिवार पेठ, कराड, जि. सातारा) यांनी दिली आहे. लिंक पाठवून मोबाईल ॲप डाऊनलोड करायला लावून कराड आणि जयसिंगपूर येथे फसवणुकीचा प्रकार घडला आहे.फिर्यादी भट्ट यांनी मोबाईलवर आलेली शेअर्स ट्रेडिंग मार्केटची लिंक उघडली. अज्ञात दोघांनी फिर्यादी यांना व्हॉट्सॲपने कमी रेटमध्ये भारतीय बाजाराचे शेअर्स खरेदी करून दुसऱ्या दिवशी जास्त परताव्याने विक्री करण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी यांना व्हॉट्सॲप ग्रुपवर ॲड करून तसेच फिर्यादीच्या मोबाईलवर एसआयजी नावाचे ॲप डाऊनलोड करून दिले.त्यानंतर फिर्यादीला डिस्काऊंट रेटमध्ये भारतीय बाजारातील शेअर्स विकत घेण्यास सांगून जादा परताव्याचे आमिष दाखविले. त्यानंतर वेगवेगळ्या खात्यामध्ये पैसे भरण्यास सांगून फिर्यादीला आजअखेर कोणताही परतावा न देता दोघांनी ६ कोटी ६९ लाख ८१ हजार रकमेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.लिंक ओपन केली अन् फसलेजयसिंगपूर येथे नातेवाईकांकडे आल्यानंतर भट्ट यांच्या मोबाईलवर एसआयजी या नावाने शेअर्स ट्रेडिंग मार्केट म्हणून एक लिंक आली. ती लिंक ओपन केल्यानंतर दोन मोबाईल क्रमांक आले. या क्रमांकावरून अज्ञातांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर शेअर बाजाराची माहिती दिली. यातच भट्ट फसले. त्यांनी तत्काळ पन्नास हजार रुपये जमा केले. त्यानंतर आरटीजीएसद्वारे रक्कम जमा करत गेले. त्यानंतर फसवणाऱ्या व्यक्तीनी त्यांना वेगवेगळ्या बँकांचे खाते क्रमांक दिले. मोठी रक्कम जमा झाल्यानंतर परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.