कनाननगरमध्ये घरात घुसून मारहाण, प्रापंचिक साहित्याची तोडफोड : सहा जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:37 IST2019-07-03T14:36:46+5:302019-07-03T14:37:37+5:30

पूर्ववैमनस्यातून कनाननगर येथील साठे चौकातील घरात घुसून सहा जणांनी साहित्याची मोडतोड करुन सोन्याचे टॉप्स, मंगळसूत्र लंपास केल्याच्या प्रकार घडला. या प्रकरणी संशयित महेश लोखंडे, अमित ऐवाळे, सतीश चौगले, अविनाश सुतार (चौघेही रा. कनाननगर), निहाल मुजावर (शिवाजी पेठ), अक्षय पाटील (रा. फुलेवाडी) यांच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

In Kananagar, a gang of six people was beaten up by six people | कनाननगरमध्ये घरात घुसून मारहाण, प्रापंचिक साहित्याची तोडफोड : सहा जणांवर गुन्हा

कनाननगरमध्ये घरात घुसून मारहाण, प्रापंचिक साहित्याची तोडफोड : सहा जणांवर गुन्हा

ठळक मुद्देकनाननगरमध्ये घरात घुसून मारहाण प्रापंचिक साहित्याची तोडफोड : सहा जणांवर गुन्हा

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून कनाननगर येथील साठे चौकातील घरात घुसून सहा जणांनी साहित्याची मोडतोड करुन सोन्याचे टॉप्स, मंगळसूत्र लंपास केल्याच्या प्रकार घडला. या प्रकरणी संशयित महेश लोखंडे, अमित ऐवाळे, सतीश चौगले, अविनाश सुतार (चौघेही रा. कनाननगर), निहाल मुजावर (शिवाजी पेठ), अक्षय पाटील (रा. फुलेवाडी) यांच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

मंदा दीपक जाधव (वय ३२ रा. अण्णाभाऊ साठे चौक, कनाननगर) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, संशयित आणि जाधव यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. १ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता संशयित फियार्दी जाधव यांच्या आईस शिवीगाळ, दमदाटी आमि धक्काबुक्की करीत घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील साहित्य विस्कटले.

दारातील दुचाकी गाडीचे नुकसान केले. कपाटातील सोन्याचे टॉप्स आणि सोन्याचे मंगळसूत्र चोरले. त्यानंतर सहा जण पसार झाले. संशयितापैकी लोखंडे आणि सुतार दोघेही सराइत गुन्हेगार आहेत. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.
 

 

Web Title: In Kananagar, a gang of six people was beaten up by six people