शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

कामचुकार डॉ. पावरा यांचा पगार रोखला, महापालिका आरोग्याधिकाऱ्यांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 2:38 PM

आॅगस्ट महिन्यात कोल्हापूर शहर परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील जबाबदारी टाळणारे कामचुकार वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांचा पगार थांबविण्याचे आदेश आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिले. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या क्षणी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मारलेली दांडी त्यांना चांगलीच महागात पडली.

ठळक मुद्देकामचुकार डॉ. पावरा यांचा पगार रोखलामहापालिका आरोग्याधिकाऱ्यांची कारवाई

कोल्हापूर : आॅगस्ट महिन्यात कोल्हापूर शहर परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील जबाबदारी टाळणारे कामचुकार वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांचा पगार थांबविण्याचे आदेश आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिले. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या क्षणी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मारलेली दांडी त्यांना चांगलीच महागात पडली.आॅगस्ट महिन्यात कोल्हापूर शहर परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या काळात शहरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली होती. तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांवर उपचार करण्याची आवश्यकता होती. अशा महत्त्वाच्या क्षणी डॉ. प्रकाश पावरा यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता दांडी मारली. त्यांनी अधिकृत रजाही दिलेली नव्हती, की कोणाला तोंडी माहितीही दिली नव्हती.

महापुराच्या काळात पूरग्रस्तांसाठी महानगरपालिकेने बऱ्याच ठिकाणी शिबिरे घेतली. रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेक स्वयंसेवा संस्था, वैद्यकीय संस्था, खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हिरिरीने पुढे आल्या; परंतु डॉ. पावरा हे १५ दिवसांपासून गायब होते. त्यांच्या पत्नीही महापालिकेकडे सेवेत आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली; परंतु डॉ. पावरा कोठे गेले हे त्यांनाही सांगता आले नाही. ‘माझीही भेट होत नाही,’ असे त्यांनी आरोग्याधिकाऱ्यांना सांगितले.महत्त्वाच्या वेळी आपली जबाबदारी टाळण्यासाठीच त्यांनी दांडी मारली, असा पक्का समज झाल्यामुळे आरोग्याधिकारी डॉ. पाटील यांनी त्यांचा पगार थांबविण्याचा आदेश दिला. पूरपरिस्थिती ओसरल्यावरच डॉ. पावरा कामावर हजर झाले आहेत. त्यांच्या या कामचुकार तसेच बेजबाबदार वृत्तीची महापालिकेत चर्चा आहे.

 

पूरपरिस्थितीच्या काळात माझ्यासह अनेक अधिकारी आजारी असतानाही नियोजित कामावर हजर राहून आपली सेवा बजावत होते. पूरग्रस्तांची सेवा करीत होते; परंतु डॉ. पावरा यांनी मात्र रजा न घेता दांडी मारली. त्यांना कुठेतरी चाप लागला पाहिजे म्हणून त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.- डॉ. दिलीप पाटील,आरोग्याधिकारी 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर