शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

भरारी पथकाच्या कारवाईत कागल, भोगावतीत नऊ लाख जप्त

By admin | Updated: October 10, 2014 00:14 IST

विधानसभा : दानेवाडीजवळ दोन लाखांच्या रकमेसह एकाचे पलायन

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाने कागल, भोगावती येथे केलेल्या तपासणीत नऊ लाख रुपयांसह १२ किलो चांदी जप्त केली, तर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दानेवाडीजवळ भरारी पथकाने चारचाकी गाडी अडवून तपासणी केली असता गाडीत दोन लाख तीस हजारांची रक्कम आढळली. मात्र, कागदपत्रे मागताच वाहनचालकाने पलायन केले. पथकाने त्याचा पाठलाग करूनही तो सापडला नाही. मतांसाठी मोठ्या प्रमाणात होणारा पैशांचा वापर लक्षात घेऊन निवडणूक विभागाने आचारसंहिता कडक केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात तपासणी नाके उभारले आहेत. आज, गुरुवारी येथील राष्ट्रीय महामार्गावर आयबीपी पेट्रोल पंपासमोर सुरू असलेल्या तपासणी केंद्रावर कर्नाटक एस.टी. बसमधून १२ किलो चांदी आणि रोख आठ लाख रुपये पकडण्यात आले. कोल्हापूर येथील प्रतिभानगरमधील चांदी व्यापारी गेनमल हिराचंद जैन यांची ही रक्कम आहे. त्यामुळे त्याचा निवडणुकीशी संबंध नाही. मात्र, तरीही तपासासाठी ही चांदी आणि रोख रक्कम कागल पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे.दरम्यान, राधानगरी-करवीर तालुक्याच्या सीमेवर भरारी पथकाच्या हाती चारचाकी गाडीत एक लाख दोन हजारांची रोकड सापडली. ही रक्कम वाईन शॉप मालकाची असल्यामुळे वेगवेगळे तर्कविर्तक लढविले जात आहेत. सायंकाळी मारुती गाडीत (एमएच १५ डी २३५८) एक लाख दोन हजारांची रोकड सापडली. गाडी किशोर चंदवानी यांच्या मालकीची असून, सापडलेल्या रकमेपैकी संबंधिताने ४० हजारांचा हिशेब दिलेला आहे. उर्वरित रकमेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. यावरून गाडी व चालक यांना करवीर पोलिसांच्यावतीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.