शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: शाहूवाडीतील कडवी धरण शंभर टक्के भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 18:35 IST

नदीकाठची पिके पुराच्या पाण्याखाली गेली आहेत

अनिल पाटीलसरुड : संततधार पावसामुळे शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण आज, मंगळवारी शंभर टक्के भरले. धरणातून ३२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कडवी नदी पात्रात केला जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी कडवी धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.गेल्या २४ तासात कडवी धरण क्षेत्रात तब्बल २१० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. अद्यापही धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरुच असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कडवी नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.नदीकाठची पिके पाण्याखालीकडवी धरणाची २.५१ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. धरणात ७१.२४ दलघमी पाणीसाठा झाला असुन पाणी पातळी ६०१ . २५ मी. वर पोहचली आहे. धरणातून विसर्ग सुरु केल्याने कडवी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून नदीला पूर आला आहे. नदीकाठची पिके पुराच्या पाण्याखाली गेली आहेत.

पूरस्थिती गंभीर होण्याची चिन्हे

कडवी नदीवरील वालुर, भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते - सावर्डे, पाटणे - सरुड हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे व चांदोली तसेच कडवी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे सरुड नजीक वारणा व कडवी नदीच्या संगमा दरम्यान पूरस्थिती गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसshahuwadi-acशाहूवाडीDamधरण