शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विधानसभेसाठी ‘राधानगरी’त मेहुण्या-पाहुण्यांनी शड्डू ठोकला, संपर्क सुरू; काँग्रेसच्यासाठी दोघांत चढाओढ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 18:20 IST

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा धुरळा अद्याप खाली बसलेला नाही, तोपर्यंत राधानगरी तालुक्यात विधानसभेसाठी जोरबैठका सुरू झाल्या. माजी आमदार के. ...

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा धुरळा अद्याप खाली बसलेला नाही, तोपर्यंत राधानगरी तालुक्यात विधानसभेसाठी जोरबैठका सुरू झाल्या. माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांनी संपर्क मोहिमेच्या माध्यमातून शड्डू ठोकले आहेत. दोघांचेही कॉंग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्न असून, आमदार सतेज पाटील कॉंग्रेसचा हात कोणाच्या हातात देतात? हे पाहणे औत्सुक्याचे असून, येथे सध्या तरी तिरंगी लढतीची शक्यता दिसत आहे.राधानगरी, भुदरगड तालुका व आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ, अशी ‘राधानगरी’ मतदारसंघाची रचना आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या अंतर्गत बंडाळीचा फायदा उठवत २०१४ पासून आमदार प्रकाश आबीटकर यांनी आपली पकड घट्ट केली. ‘के. पी’ व ‘ए. वाय.’ यांनी विधानसभा लढण्याची तयारी केली असली, तरी महायुती अशीच राहिली, तर उमेदवारीची अडचण येणार, म्हणून के. पी. पाटील यांनी दुसरा पर्याय म्हणून कॉंग्रेसशी जुळवून घेतले आहे. ‘बिद्री’च्या निवडणुकीपासून सतेज पाटील यांचा गट ‘के. पी.’ यांच्या सोबत आहे. त्यानंतर, दिवंगत आमदार पी. एन. पाटील व सतेज पाटील यांच्या माध्यमातून ‘ए. वाय.’ हेही कॉंग्रेसच्या जवळ आले आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचा त्यांच्यावर दबाव असतानाही त्यांनी शाहू छत्रपती यांना बिनशर्त पाठिंबा देऊन ‘राधानगरी’ तालुका पिंजून काढला. दिवंगत आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील गटाला सोबत घेऊन तालुका एकतर्फी शाहू छत्रपतींच्या मागे उभा करण्याची किमया त्यांनी केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर मेहुण्या-पाहुणे विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. ‘ए. वाय.’ यांनी भुदरगड तालुक्यातील कडगाव येथून, तर ‘के. पी.’ यांनी राधानगरी तालुक्यातील वाकीघोळ येथून संपर्क सुरू करत शड्डू ठोकला आहे.

‘हात’, ‘मशाल’, ‘घड्याळ्या’चा पर्यायलोकसभेतील निकालानंतर महायुती व आघाडी एकसंधपणेच विधानसभेला सामाेरे जातील, असे आताचे तरी चित्र आहे. जागा वाटपावरून ताणाताणी झाली, तर ‘राधानगरी’त कॉंग्रेस, उद्धवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवार शोधावा लागेल. महायुतीही स्वतंत्र लढली, तर के. पी. पाटील हे हातात ‘घड्याळ’च बांधण्याची शक्यता अधिक आहे. त्यावेळी ‘ए. वाय.’ ‘हात’ घेऊन रिंगणात असू शकतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणK P. Patilके. पी. पाटीलA. Y Patilए. वाय. पाटीलradhanagari-acराधानगरी