Kolhapur: ‘चांगभलं’चा गजर, जोतिबावरील खेट्यांची उत्साहात सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:01 IST2025-03-10T13:58:56+5:302025-03-10T14:01:12+5:30

जोतिबा : ‘चांगभलं’च्या गजरात रविवारी श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात जोतिबाच्या खेटा यात्रेची सांगता झाली. कोल्हापूर ते ...

Jyotiba Kheta Yatra concludes in a devotional atmosphere | Kolhapur: ‘चांगभलं’चा गजर, जोतिबावरील खेट्यांची उत्साहात सांगता

Kolhapur: ‘चांगभलं’चा गजर, जोतिबावरील खेट्यांची उत्साहात सांगता

जोतिबा : ‘चांगभलं’च्या गजरात रविवारी श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात जोतिबाच्या खेटा यात्रेची सांगता झाली. कोल्हापूर ते जोतिबा डोंगर अशा पायी प्रवासाने माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून दर रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते. आज सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविकांनी श्री जोतिबाचे गुलाल-खोबऱ्याची उधळण करून दर्शन घेतले. रविवारी जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती.

माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून सुरू होणाऱ्या खेटे यात्रेचा रविवारी चौथा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. कोल्हापूर शहरासोबत महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतील अनेक भाविकही मोठ्या श्रद्धेने खेट्यासाठी सहभागी झाले होते. रविवारी शेवटचा खेटा असल्याने भाविकांची मंदिर परिसरात गर्दी होती. यावेळी हजारो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले होते.

‘चांगभलं’च्या गजराने डोंगरघाट आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवारी पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. सकाळी ८ ते ९ अभिषेक, सकाळी ११ वाजता धुपारती सोहळा पार पडला. या सोहळ्यात घोडे, उंट, वाजंत्री, पुजारी गावकरी सहभागी झाले होते. दुपारी ३ ते ४ अभिषेक, रात्री पालखी सोहळ्याने खेट्याची सांगता झाली. चौथ्या खेट्यानिमित्त श्री जोतिबाची सरदारी स्वरूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती. शेवटच्या खेट्यानिमित्त जागोजागी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच भाविकांना लस्सीचे वाटप केले.

Web Title: Jyotiba Kheta Yatra concludes in a devotional atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.