गुरु -शनी महायुती दर्शनाची अजूनही आठवडाभर संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 19:44 IST2020-12-22T19:38:34+5:302020-12-22T19:44:19+5:30

Astrology Jupiter-Saturn -सूर्यास्तानंतरच्या आकाशात पश्चिमेला क्षितिजाच्या थोडे वर आलेल्या 'गुरु- शनि या तेजस्वी ग्रहांच्या महायुती'च्या दर्शनाची संधी खगोलप्रेमींसाठी अजून आठवडाभर उपलब्ध असणार आहे. तब्बल ३९७ वर्षांनी या अतिशय दुर्मीळ खगोलीय घटनेचे साध्या डोळ्यांनी लाभ घेता येत आहे.

Jupiter-Saturn Mahayuti Darshan still a week-long opportunity | गुरु -शनी महायुती दर्शनाची अजूनही आठवडाभर संधी

गुरु -शनी महायुती दर्शनाची अजूनही आठवडाभर संधी

ठळक मुद्देगुरु -शनी महायुती दर्शनाची अजूनही आठवडाभर संधीडिसेंबरचे अवकाश निरभ्र : खगोलप्रेमींसाठी पर्वणी

कोल्हापूर : सूर्यास्तानंतरच्या आकाशात पश्चिमेला क्षितिजाच्या थोडे वर आलेल्या 'गुरु- शनि या तेजस्वी ग्रहांच्या महायुती''''च्या दर्शनाची संधी खगोलप्रेमींसाठी अजून आठवडाभर उपलब्ध असणार आहे. तब्बल ३९७ वर्षांनी या अतिशय दुर्मीळ खगोलीय घटनेचे साध्या डोळ्यांनी लाभ घेता येत आहे.

अवकाशातील या नाट्यमय घडामोडी पाहणाऱ्यांसाठी सोमवारची सायंकाळ म्हणजे एक पर्वणी ठरली. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आल्याचा भास पाहणाऱ्यांना झाला. हे दोन ग्रह परस्परांपासून फक्त ०.१ अंश (६ मिनिटे ६ आर्कसेकंद) इतक्या कमी अंतरावर म्हणजे ७३५ मिलियन किलोमीटर इतक्या अंतरावर आले आहेत.

अजूनही येत्या आठवड्याभर सूर्यस्तानंतर लगेचच निरिक्षण केल्यास या अवकाशनाट्याचा आंनद मनमुरादपणे घेता येणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक किरण गवळी आणि डॉ. राजेंद्र भस्मे यांनी दिली. सोमवारी त्यांनी चंबुखडीच्या टेकडीवर दुर्बिणीतून तसेच साध्या डोळ्यांनी या दुर्मिळ युतीचे दर्शनाचा कार्यक्रम घेतला होता. त्याचा लाभ डॉ. किरण भिंगार्डे ,डॉ. किरण जोशी, आयटीआयचे प्राचार्य मुंडासे यांच्यासह कोल्हापुरातील २०० खगोलप्रेमींनी घेतला.


गुरु आणि शनी या दोन ग्रहांची सध्या अवकाशात युती झाली. या दोन ग्रहांमधील अंतर जवळपास ४०० प्रकाश वर्षांनी सर्वात कमी झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे अंतर सातत्यानं कमी होत आहे. सोमवारी हे अंतर सर्वात कमी म्हणजे अवघे ०.१ अंश इतके झाले त्यामुळे उघड्या डोळ्यांना हे दोन्ही ग्रह एक झाल्याचा आभास झाला.
- डॉ. राजेंद्र भस्मे,
खगोल निरिक्षक,कोल्हापूर.

महायुतीचे दर्शन आता थेट साठ वर्षांनी

ही अनोखी महायुती सूर्यास्तानंतर रात्री आठ वाजेपर्यंत दिसली. २१ डिसेंबरला उत्तर गोलार्धात सुर्य दक्षिणेकडे मकर वृत्तापर्यत पोहोचला. कालची रात्र सर्वात मोठी म्हणजे बारा तास पंचावन्न मिनिटांची तर दिवस सर्वात लहान म्हणजे अकरा तास पाच मिनिटांचा होता. आता सूर्य ऊत्तरेकडे सरकू लागेल आणि २१ मार्चला तो विषुववृत्तावर असेल. त्यानंतर आणखी उत्तरेकडे सरकून सूर्य २१ जूनला कर्कवृत्ताजवळ पोहोचेल. या दिवशी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. यापूर्वी १६२३ मध्ये हे दोन ग्रह एकमेकांच्या इतके जवळ आले होते. त्यानंतर आता थेट साठ वर्षांनी म्हणजे १५ मार्च२०८० रोजी ते पुन्हा खूप जवळ येणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यातील ही एकमेव संधी होती.

खगोलशास्त्रानुसार पृथ्वीपासून सरासरी अंतरे (किलो मिटर) 

(१)चंद्र :- 4 लक्ष..(२)सूर्य:- 15 कोटी..(३)बुध:- 10 कोटी..(४)शुक्र :- 5 कोटी .. (५)मंगळ:- 8 कोटी..(६)गुरू:- 65 कोटी..(७)शनी :- 130 कोटी ..(८) हर्षल:- 270कोटी..(९) नेपच्युन: 440 कोटी.


२१ डिसेंबर हा वर्षातील सर्वांत लहान दिवस

ही अनोखी महायुती  सूर्यास्तानंतर रात्री आठ वाजेपर्यंत दिसली. २१ डिसेंबरला उत्तर गोलार्धात सुर्य दक्षिणेकडे मकर वृत्ता पर्यत पोहोचला. काल सर्वात मोठी रात्र म्हणजे बारा तास पंचावन्न मिनिटांची तर सर्वात लहान दिवस अकरा तास पाच मिनिटांचा होता उद्यापासून सूर्य ऊत्तरेकडे सरकू लागेल आणि२१ मार्चला तो विषुववृत्तावर असेल त्या नंतरआणखी उत्तरेकडे सरकून सूर्य २१ जूनला कर्कवृत्ताजवळ पोहोचेल. या दिवशी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते यापूर्वी १६२३ साली हे दोन ग्रह एकमेकांच्या इतके जवळ आले होते. त्यानंतर आता थेट साठ वर्षांनी म्हणजे १५ मार्च२०८० रोजी ते पुन्हा इतके जवळ येणार आहेत.

 

Web Title: Jupiter-Saturn Mahayuti Darshan still a week-long opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.