शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
2
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
3
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
4
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
5
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
6
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
8
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
9
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
10
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
11
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
12
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
13
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
14
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
15
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
16
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
17
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
18
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
19
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
20
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले

Kolhapur: मंत्री मुश्रीफांसाठी सख्ख्या भावाबरोबर वैरत्व पत्करले. पण..; प्रवीणसिंह पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:48 IST

मुरगूड येथील बैठकीत केले शिक्कामोर्तब

मुरगूड : गेल्या वीस वर्षांपासून आपण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रामाणिक काम करत होतो. त्यांच्यासाठी सख्ख्या भावाबरोबर वैरत्व पत्करले. पण, वारंवार माझ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात हालचाली सुरू होत्या. कोणाच्या तरी सांगण्यावरून माझ्यावर, माझ्या गटावर अविश्वास दाखवला जात होता. यामुळेच आपण मुश्रीफ यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे शेतकरी संघांचे माजी अध्यक्ष, बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी जाहीर केले.मुरगूड येथील निवासस्थानी पार पडलेल्या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रवीणसिंह पाटील यांचा मंगळवारी मुंबई येथे कार्यकर्त्यांसह भाजपा कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश होणार आहे.पाटील म्हणाले, मुश्रीफ यांच्याबरोबर जाताना आपण त्यांना शब्द दिला होता. त्यामुळे कार्यकर्ते तक्रार करत आल्यानंतर आपण त्यांची समजूत काढत होतो. पण, काही दिवसांपूर्वी मुश्रीफ यांनी एका जबाबदार व्यक्तीकडून राजकारण करताना सावध पावले उचला, अन्यथा त्रास होईल, असा संदेश दिला. मुरगूडबाबत कोणताही निर्णय घेताना आपल्याला डावलले जात होते. जनमानसात ज्याची प्रतिमा बरबटलेली आहे, त्याच्याबरोबर जाण्याची आपली अजिबात इच्छा नाही. त्यामुळे भाजपामध्ये जाण्याच्या निर्णय घेतला.सुधीर सावर्डेकर यांनी स्वागत केले. सुरेश लंबे, अमर कांबळे, संपत कोळी, संभाजी गायकवाड, कृष्णात कापशे, मारुती कांबळे, संजय भारमल, अरुण पाटील, सुधीर मसवेकर, शिवाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस दिग्विजय पाटील, आंनदराव कल्याणकर, आनंदा पाटील, एम. बी. ठाणेकर, प्रकाश पाटील, भरत घोटणे, दत्तात्रय पाटील, अरुण पाटील, बाळासो आंगज, दादासो चौगले व संजय मोरबाळे आदी उपस्थित होते.भावाबाबत कोणतीच अडचण नव्हतीआपले बंधू रणजितसिंह पाटील मुश्रीफ यांच्याकडे येत आहेत म्हणून आपण मुश्रीफ यांना सोडत आहोत, हा गैरसमज आहे. आम्ही एकत्र बोलून निर्णय घेतले असते तर कोणतीच अडचण नव्हती. शेवटी आम्ही भाऊच आहोत. त्यांनी जो मार्ग निवडला तो चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Patil defects to BJP, citing betrayal by Mushrif.

Web Summary : Pravinsinh Patil joins BJP, ending 20-year loyalty to Minister Mushrif. He alleges Mushrif distrusted his group and favored rivals, ignoring Patil's advice and sidelining him on key decisions. He denies brother's move to Mushrif camp as a reason.