गडहिंग्लज : गुढीपाडव्यानिमित्त श्री रेणुकादेवी मंदिरात देवीच्या अंगावर घातलेल्या तब्बल साडेतीन लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. नूल येथे झालेल्या या चोरीमुळे सीमाभागात खळबळ उडाली आहे. रविवारी (दि. २२) सकाळी ही चोरी उघडकीस आली.पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, नूल-येणेचवंडी मार्गावर भरवस्तीत श्री रेणुकादेवीचे मंदिर आहे. देवीची पूजाअर्चा सुशव्वा भीमा राजंगळी, द्रौपदी रामा राजंगळी व सोनव्वा यमन्नाप्पा सरनाईक या देवदासी भगिनींकडे आहे. एक-एक महिनाच्या मुदतीने तिघीही आळीपाळीने देवीची पूजा करतात. सध्या सुशव्वा यांच्याकडे देवीची पूजा आहे.गुरुवारी (दि. १९) गुढीपाडवा असल्यामुळे सुशव्वा यांनी देवीच्या मूर्तीवर सोन्या-चांदीचे दागिने घातले होते. सणवार असल्यामुळे मूर्तीवरील दागिने तसेच ठेवले होते. शनिवारी (दि. २१) सायंकाळी मंदिरात दिवाबत्ती करून गाभाऱ्याला कुलूप लावले. त्यावेळी देवीच्या मूर्तीवर दागिने होते. दरम्यान, रविवारी (दि. २२) सकाळी ७ वाजता त्या पूजेसाठी मंदिरात गेल्या असता गाभाऱ्याचे कुलूप तुटलेले दिसले. गाभाऱ्यात जाऊन पाहिले असता देवीच्या अंगावरील दागिने गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पोलिस पाटील परशराम सरनाईक यांच्या मदतीने दागिन्यांची शोधाशोध केली. मात्र, दागिने सापडले नाहीत. सुशव्वा राजंगळी यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज ठाण्यात चोरीची नोंद झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक पल्लवी पवार अधिक तपास करीत आहेत.मंदिरातील चोरीची तिसरी घटनायापूर्वी चोरट्यांनी नूलमधील गणेश मंदिरातील दानपेटीवर, तर लक्ष्मी मंदिरातील देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. त्यानंतर मंदिरातील चोरीची ही तिसरी घटना आहे.
हे दागिने गेले चोरीलामणी मंगळसूत्र, जुन्या माठाची बोरमाळ, एकसारमाळ (प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाची ७० हजार रुपये किमतीचे), अर्धा किलो चांदीचा मुखवटा (८० हजार), देवीच्या हाताचे सव्वाशे ग्रॅम वजनाचे २ पंजे (४० हजार), १५ ग्रॅमचा चांदीचा कडा (२४०० रुपये) एकूण ३,३२,४०० रुपये.
Web Summary : Thieves stole ₹3.32 lakh worth of gold and silver jewelry from the Renuka Devi temple in Nool. The theft occurred after Gudi Padwa, prompting a police investigation following a complaint.
Web Summary : नूल में रेणुका देवी मंदिर से 3.32 लाख रुपये के सोने और चांदी के आभूषण चोरी हो गए। गुड़ी पड़वा के बाद चोरी हुई, शिकायत के बाद पुलिस जांच कर रही है।