शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

जयसिंगराव पवार, रमेश जाधव यांना ‘राजर्षी शाहू विचार पुरस्कार’ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 1:53 AM

छत्रपती शाहू महाराज यांना २५ एप्रिल १९१९ ला कानपूर येथे कुर्मी समाजाने ‘राजर्षी’ ही पदवी दिली. त्याला शंभर वर्षे झाली आहे. या समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक येथे ‘राजर्षी कृतज्ञता परिषद’

ठळक मुद्देवसंतराव मुळीक : कोल्हापुरात गुरुवारी राजर्षी कृतज्ञता परिषद

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज यांना २५ एप्रिल १९१९ ला कानपूर येथे कुर्मी समाजाने ‘राजर्षी’ ही पदवी दिली. त्याला शंभर वर्षे झाली आहे. या समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि. २०) सायंकाळी ५.३० वाजता शाहू स्मारक येथे ‘राजर्षी कृतज्ञता परिषद’ आयोजित केली आहे. राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंच व मराठा महासंघातर्फे त्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी सोमवारी दिली.

यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. रमेश जाधव यांना ‘राजर्षी शाहू विचार पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा मुळीक यांनी केली. त्याचबरोबर व्यंकाप्पा भोसले, डॉ. टी. एस. पाटील, भिकशेठ पाटील, सतीश रणदिवे, डॉ. पद्मा पाटील, शाहूभक्त कै. गंगाराम कांबळे यांचे कुटुंबीय व शाहूकालीन संस्था, वसतिगृह, संशोधन केंद्र, शाहू विचारांने कार्यरत संस्थांना ‘राजर्षी शाहू सन्मानपत्र’ देण्यात येणार आहे.

मुळीक म्हणाले, या परिषदेसाठी अध्यक्षस्थान शाहू छत्रपती भूषविणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, प्रमुख उपस्थिती अ.भा. कुर्मी क्षत्रिय महासभेचे राष्टÑीय अध्यक्ष एल. पी. पटेल, मंडल अध्यक्ष कैलाशचंद्र पटेल, डॉ. राजकुमार सचान, संजेशकुमार कटियार, अ‍ॅड. शशिकांत सचान आदींची राहणार आहे. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, बबन रानगे, शिवमूर्ती झगडे, कादर मलबारी, प्रताप नाईक, शरद साळुंखे, प्रशांत बरगे, शंकरराव शेळके, अवधूत पाटील, रामचंद्र पोवार उपस्थित होते.राजर्षी पदवी शताब्दीनिमित्त असे होणार उपक्रम२० जून : सकाळी १० ते २ - कुर्मी बांधवांसमवेत शाहू जन्मस्थळ, न्यू पॅलेस भेट२१ जून : १० ते ४ - शाहू समाधी स्थळ, जुना राजवाडा भेट२३ जून : १० ते ८ - शाहूचित्र प्रदर्शन (राजर्षी छत्रपती शाहू स्मारक कलादालन)२५ जून : सायंकाळी ७ - अग्निदिव्य शाहूंच्या जीवनावरील वैचारिक नाटक (संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह)२६ जून : सकाळी ८ - राजर्षी शाहू जयंती३० जून ते १५ जुलै : शाहू जीवनावर आधारित जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थी वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर