शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जयश्री जाधव यांना निवडून आणाच, ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे क्षीरसागर, संजय पवारांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 12:32 IST

मुख्यमंत्री दालनात झालेल्या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना कोणत्याही परिस्थिती निवडून आणावेच लागेल, असा आदेश सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांना दिला. गाफील राहू नका, ताकदीने कामाला लागा, असेही त्यांनी सांगितले.‘कोल्हापूर उत्तर’च्या जागेवर राजेक्ष क्षीरसागर यांनी दावा सांगितला होता. मात्र आघाडीच्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसला देण्यात आली. त्यामुळे क्षीरसागर काहीसे नाराज होते, जयश्री जाधव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते नॉट रिचेबल होते. त्यानंतर रविवारी दुपारी झालेल्या आघाडीच्या मेळाव्याकडेही त्यांनी पाठ फिरवले होते. त्यामुळे आघाडीच्या पातळीवर काहीसी संभ्रमावस्था पसरली होती. या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलवले.

त्यानुसार, सोमवारी दुपारी मुख्यमंत्री दालनात झालेल्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राजेश क्षीरसागर व संजय पवार यांच्यात बैठक झाली. यामध्ये निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली.त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी खासदार राऊत, अरुण दुधवडकर, संजय पवार, राजेश क्षीरसागर यांच्या सोबत चर्चा केली. जयश्री जाधव या काँग्रेसच्या नव्हेतर शिवसेनेचा उमेदवार म्हणून ताकदीने कामाला लागा. गाफील राहू नका, कोणत्याही प्रकारची हयगय चालणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जयश्री जाधव यांना निवडून आणावेच लागेल, असा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. सुमारे अर्धा तास बैठक झाली.

जाधव यांना आमदार करूनच मातोश्रीवर येऊजयश्री जाधव यांना आमदार करण्यासाठी दिवसरात्र एक करू, त्यांना आमदार करूनच ‘मातोश्री’वर घेऊन येऊ, अशी ग्वाही संजय पवार व क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर