जयंत पाटील यांनी दिल्या दिल्लीसाठी फडणवीस यांना शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 16:10 IST2020-02-22T16:07:49+5:302020-02-22T16:10:41+5:30
देवेन्द फडणवीस आता फारकाळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत या आरएएसचे भैय्या जोेशी यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस दिल्लीला जाणार हे ऐकून आनंद वाटला, त्यांना आमच्या मन:पुर्वक शुभेच्छा अशी मिश्कील टिप्पणी केली.

जयंत पाटील यांनी दिल्या दिल्लीसाठी फडणवीस यांना शुभेच्छा
कोल्हापूर: देवेन्द फडणवीस आता फारकाळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत या आरएएसचे भैय्या जोेशी यांनी केलेल्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस दिल्लीला जाणार हे ऐकून आनंद वाटला, त्यांना आमच्या मन:पुर्वक शुभेच्छा अशी मिश्कील टिप्पणी केली.
कोल्हापुरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय ब्राम्हण परिषदेच्या उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी औपचारीक गप्पा मारताना मंत्री पाटील यांनी वरील वक्तव्य केले.
महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची धुसफूस नाही. मतभेद तर अजिबात नाहीत, असे पाटील यांनी स्पष्ट करुन सरकार भक्कम असल्याचाही निर्वाळा दिला.