शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

कोल्हापूर दिवाळीच्या दिवशीच शोकमग्न; पाकिस्तानच्या गोळीबारात बहिरेवाडीचा जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 8:05 PM

जम्मू-काश्मीर येथील पूँछ जिल्ह्याच्या सवजियानमध्ये पाकिस्तानचे सैन्य व भारतीय सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीत बहिरेवाडी. ता. आजरा येथील जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे  (वय-२०) शहीद झाला.दिवाळी सुरु असताना गावावर शोककळा पसरली.

ठळक मुद्देबहिरेवाडीचा जवान जम्मू- काश्मीर मध्ये शहीदभारत -पाक सैन्यात चकमक

रवींद्र येसादेउत्तूर : जम्मू-काश्मीर येथील पूँछ जिल्ह्याच्या सवजियानमध्ये पाकिस्तानचे सैन्य व भारतीय सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीत बहिरेवाडी. ता. आजरा येथील जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे  (वय-२०) शहीद झाला.दिवाळी सुरु असताना गावावर शोककळा पसरली.ऋषिकेश जोंधळे सीमेवर शहीद झाल्याचे सांयकाळी पाचनंतर कळताच गावकऱ्यांना धक्का बसला . केवळ दोन वर्ष सेवा बजावलेल्या जवान ऋषिकेश शहीद झाला. बेळगाव येथे भरती झाल्यानंतर तो जम्मू - काश्मीर येथे सेवा बजावत होता. शुक्रवारी पहाटे पूँछ जिल्हयाच्या सवजियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात येत होता. शस्त्रसंधीचे उल्लंघन. पाक सैन्याकडून सुरू होते. भारतीय सैन्यांनी चोख उत्तर दिले.

या हल्यात देसाई हा गंभीररित्या जखमी झाला. उपचारासाठी हॅलिकॉप्टरमधून सैन्याच्या दवाखान्याकडे नेत असताना त्याचे निधन झाले . २०१८ मध्ये सहा मराठा लाईफ इन्फट्री मध्ये तो भरती झाला होता. त्याचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण बहिरेवाडीत तर ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण गडहिंग्लज येथील साधना विद्यालयात झाले.बुधवारी जोंधळे आपल्या घरातील आई, वडिल , बहिण यांचेशी बोलला ते अखेरचे बोलणे झाले. लॉकडाऊनच्या काळात जूनमध्ये तो सुट्टीवर आला होता . त्यानंतर तो गावातील जवान विनायक कोपटकर ऑगष्टमध्ये जम्मू - काश्मीर येथे सेवा बजावण्यासाठी गेले . ते दोघे एकाच युनिटमध्ये होते.

पार्थिव रविवारी येण्याची शक्यताजोंधळे यांचे पार्थिव गावात रविवारी येण्याची शक्यता असून बाहेरेवाडी हायस्कूलच्या मैदानावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार होणार आहेत .गावातील दुसरा जवान शहीदजम्मू काश्मीर मध्ये प्रविण जानबा येलकर हे २०१७ मध्ये शहीद झाले होते. त्यानंतर जोंधळे हे शहीद झाले.आई, बहीण, वडीलांचा आक्रोश आपला मुलगा शहीद झाल्याचा फोन मित्राकरवी रामचंद्र शेवाळे यांना आला अन् त्यांना एकच धक्का बसला. आई, बहीण यांचा आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. घरासमोर एकच गर्दी झाली होती.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानkolhapurकोल्हापूरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तान