शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

जैन महामंडळ आणखी मजबूत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:56 IST

नांदणी मठाला अ वर्ग दर्जा देऊ, नांदणी येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाला भेट

जयसिंगपूर/उदगाव : जगा आणि जगू द्या, ही शिकवण देणारा हजारो वर्षांचा इतिहास सांगणारा प्राचीन धर्म म्हणजे जैन धर्म. जैन समाजाने अहिंसा व अपरिग्रह सांगितले आहे. जगात सर्वाधिक पुण्यकार्य, दानकार्य व समाजकार्य करणारा समाज म्हणून जैन धर्माची ओळख आहे. सरकारने जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ तयार केले आहे. मजबूत पिढी उभे करण्याचे काम या महामंडळाच्या माध्यमातून कसे करता येईल, हा प्रयत्न असणार आहेत. हे महामंडळ आणखी बळकट करू त्याला आर्थिक पाठबळ देऊ, तसेच नांदणी येथील मठाला अ वर्ग दर्जा निश्चित देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नांदणी (ता.शिरोळ) येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा आणि मस्तकाभिषेक महामहोत्सवाला मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भेट दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काल नागपूरमध्ये जितोमधून काम करणाऱ्या जैन समाजाला पाहिले आणि आज कोल्हापुरातील काळ्या आईची सेवा करणाऱ्या कष्टकरी समाजाला पाहण्याचाही योग मला मिळाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापुरातील पहिलेच कार्यक्रम दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या नांदणी मठाच्या कार्यक्रमाला येण्याचा मला मान मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नांदणी मठाच्या वतीने जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रजागर्क ही उपाधी व मानपत्राने सन्मानित करण्यात आले.आचार्य विशुद्धसागरजी महाराज म्हणाले, भगवान आदिनाथ यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राच्या प्रमुखपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत विहार करावा. श्रीराम, भरत व ऋषभनाथ यांच्या राज्यात ज्याप्रमाणे कोणत्याही धर्माला साधूसंतांना उपासना करण्यात कोणताही अडसर येत नव्हता. त्याचप्रमाणे, आपल्या राज्यात साधुसंतांना विहार करताना उपासना करताना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे आवाहन महाराज यांनी केले.आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, आपल्या भागातील जैन समाज हा शेतकरी व कष्टकरी आहे. येथील शेतकरी कष्टाळू असून, सध्या प्रत्येकांची शेती कमी होत आहे. पर्यायाने आमच्या समाजातील मुले पुणे, मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी जात आहेत. मात्र, त्यांना त्या ठिकाणी राहण्याची सोय नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. जैन समाजासाठी राज्य शासनाकडून पुणे, मुंबई या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी. आपण त्या ठिकाणी आश्रम उभा करू, असे सांगून नांदणी मठासाठी ३० ते ३५ कोटींची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सुरेश खाडे, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रांताधिकारी मोसमी बर्डे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, स्वरूपा पाटील-यड्रावकर, सुरेश हाळवणकर, सुरेश पाटील, शौमिका आवाडे, उद्योजक आण्णासाहेब चकोते, सागर शंभूशेटे, उत्तम पाटील, संभाजी भिडे, जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कर्मवीरचे रावसाहेब पाटील, सरपंच संगीता तगारे यांच्यासह आचार्य व मुनीसंघ, श्रावक-श्राविका उपस्थित होते.शांतीसागर महाराज यांना भारतरत्न द्या : शेट्टीमाजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. निवेदनात संपूर्ण समाजाच्या वतीने नांदणी मठाला अ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली आहे, तसेच आचार्य शांतीसागर महाराज यांना आचार्यपद मिळून शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने भारत सरकारकडून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशीही मागणी निवेदनात केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJain Templeजैन मंदीर