Jadhav Ajinkya at the Varna Marathon event | वारणा मॅरेथॉन स्पर्धेत जाधव अजिंक्य : स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद
वारणा उद्योग व शिक्षण समूहातर्फे वारणा बझार व तात्यासाहेब कोरे क्रीडा प्रबोधिनीकडून आयोजन खुल्या गटात बंडू माने (वय ८०, रा. ठमकेवाडी), गोरखनाथ केकरे (७०, रा. कोडोली), ज्योतिराम मानकर (५७, रा. कोडोली), अशोक शंकर पाटील (५०) यांनी स्पर्धा पूर्ण केली.

ठळक मुद्देसंजय झाकणे, खुशबू खान, पंकज मरोटे विविध गटांत विजयी

वारणानगर : सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या २५ व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित केलेल्या वारणा मॅरेथॉन स्पर्धेत २१ किलोमीटर पुरुष खुल्या गटामध्ये सातवे (ता. पन्हाळा) येथील सातवे स्पोर्टस् बॉईजच्या प्रताप राजेश जाधव याने प्रथम, तर १० किलोमीटर पुरुष खुल्या गटात वारणा महाविद्यालयाच्या संजय मारुती झाकणे याने व ५ किलोमीटर महिलांच्या खुल्या गटात वारणेच्याच खुशबू राजू खान यांनी प्रथम क्रमांक मिळवून ही मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. पुरुष महाविद्यालयीन गटात ५ कि. मी.मध्ये पंकज माणिकराव मरोटे (क्रीडा प्रबोधिनी पुणे) याने प्रथम क्रमांक पटकावला.

वारणा उद्योग व शिक्षण समूहाच्यावतीने वारणा बझार व तात्यासाहेब कोरे क्रीडा प्रबोधिनी यांच्या सहकार्यातून आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा मॅरेथॉन स्पर्धा घेण्यातआली. सकाळी स्पर्धेचे उद्घाटन वारणा बझारचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, सरव्यवस्थापक शरदमहाजन यांच्या हस्ते व संचालक विश्वनाथ पाटील, अनिल पाटील, मोहन राजमाने, आदींच्या उपस्थितीत झाले.दुपारी विजेत्या स्पर्धकांना कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे व वारणा कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांच्या
हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रोख रक्कम व तात्यासाहेब कोरे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये ५ कि. मी.च्या पुरुष खुल्या गटात बंडू माने (वय ८०, रा. ठमकेवाडी), गोरखनाथ केकरे (७०, रा. कोडोली), ज्योतिराम मानकर (५७, रा. कोडोली), अशोक शंकर पाटील (५०) यांनी सहभाग घेऊन स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल चौघांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रारंभी वारणा महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. के. जी. जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. क्रीडा प्रशिक्षक प्रा. विशाल चव्हाण, के. एस. तिरुज्ञानसंपदम, दीपक चव्हाण, दीपक कुंभार, संभाजी पाटील, बझारचे अधिकारी दिलीप पाटील, शिवाजी पाटील, संदीप पाटील, महेश आवटी, तानाजी ढेरे, हणमंत दाभाडे, प्रदीप शेटे, रघुनाथ मलगुंडे, सर्जेराव पाटील, संग्राम दळवी, युवराज जाधव, उदय पाटील, संजय जाधव व इतर क्रीडाप्रेमी, कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. बझारचे संचालक विश्वनाथ पाटील यांनी आभार मानले. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.


वारणानगर येथे आयोजित केलेल्या वारणा मॅरेथॉन स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे व कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी बझारचे सरव्यस्थापक शरद महाजन, उपाध्यक्ष सुभाष देसाई, भाऊसाहेब मलगुंडे, डॉ. के. जी. जाधव, सिद्धार्थ हिरवे, विश्वनाथ पाटील, मोहन आजमने, आदी मान्यवर उपस्थित होते.


 

Web Title: Jadhav Ajinkya at the Varna Marathon event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.