‘खाऊचे पान’ रंगते छान
By Admin | Updated: July 14, 2014 01:02 IST2014-07-14T00:46:17+5:302014-07-14T01:02:03+5:30
थक्क करणारी उलाढाल : दररोज लागतात साडेदहा लाख पाने

‘खाऊचे पान’ रंगते छान
सचिन भोसले - कोल्हापूर. जेवण कोणतेही असो, जेवणानंतर त्या जेवणाची लज्जत आणि जेवलेले जेवण पचनासाठी खाऊच्या पानाचा विडा चघळणे हा काही न्याराच अनुभव असतो. त्यात ‘गोविंद विडा’ मिळाला, तर दुधात साखरच म्हणावी लागेल. विडा म्हणजे तयार खाऊचे पान होय. या खाऊच्या पानांमध्ये देशी, मद्रासी, बनारस, कोलकाता आणि मगई या प्रकारच्या खाऊच्या पानांच्या जाती तर खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. अशा या पानांची उलाढाल तर थक्क करणारी आहे. सध्या कोल्हापूरच्या खाऊच्या पानांचा बाजार तर पूर्वीपासून कोकण, गोवा या प्रांतात सर्वश्रुत आहे. अशा या बाजारात दररोज सुमारे साडेतीनशे करंड्यांची आवक होते आणि तितकीच पाने खपतातही. भारतात खाऊच्या पानाचा विडा राजापासून सर्वसामान्यांपर्यंत खाल्ला जातो. या खाऊच्या पानाचे मूळ नाव ‘नागवल्ली’ किंवा ‘नागरवेल’ असे आहे. अशा या खाऊच्या पानांची माहिती करून घेऊ ‘लोकमत’संगे.