शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हुपरीतील चांदी व्यावसायिकाचा खून भावानेच केल्याचे निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:41 IST

हुपरी : येथील चांदी व्यावसायिक ब्रम्हनाथ सुकुमार हालुंडे (वय ३१, रा. सिल्व्हर झोन वसाहत हुपरी) यांचा सख्खा भाऊ प्रवीण ...

हुपरी : येथील चांदी व्यावसायिक ब्रम्हनाथ सुकुमार हालुंडे (वय ३१, रा. सिल्व्हर झोन वसाहत हुपरी) यांचा सख्खा भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे यानेच कौटुंबिक कलह, वाटणी व व्यावसायिक स्पर्धेतून मित्राच्या मदतीने खून केल्याचे पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे. सहायक पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे व शिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी जलदगतीने तपास यंत्रणा राबवून काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.या प्रकरणी भाऊ पवन सुकुमार हालुंडे (वय २६) व त्याचा मित्र आनंदा शिवाजी खेमलापुरे (२२, दोघेही रा. वाळवेकरनगर हुपरी) यांना पोलिसांनी रविवारी रात्रीच संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा कबूल केल्यानंतर घटनास्थळावरून लंपास केलेली सुमारे १५ लाख रुपये किमतीची चांदीचे दागिने आनंदा खेमलापुरे याच्या घरातून जप्त केले. हुपरी पोलिसांनी या दोघांना अटक करून पुढील तपासांसाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ब्रम्हनाथ हालुंडे व भाऊ प्रवीण यांचा परपेठेवरील सराफांच्या मागणीनुसार चांदी दागिने बनवून घेऊन पोहोच करण्याचा व्यवसाय होता. प्रवीणच्या पेठेवरील खातेदार सराफांना ब्रम्हनाथ हे कमी वेस्टेजमध्ये दागिने द्यायचे त्यामुळे दोघांत वेळोवेळी वाद होत असत. तसेच प्रवीणने चार-पाच वर्षांपूर्वी केलेला प्रेमविवाहही कुटुंबाला मान्य नव्हता. त्यामुळे त्याला घरातून बाहेर काढले होते. त्याला वडिलांच्या मिळकतीत वाटणी देण्यात येत नव्हती.

प्रवीणच्या याच कृत्यामुळे मोठा भाऊ असूनही ब्रम्हनाथ याचा विवाह होण्यामध्ये अडथळे येत हाेते. अशा विविध प्रकारच्या कारणातून ब्रम्हनाथ याने कांही दिवसांपूर्वी प्रवीणच्या अंगावर चारचाकी गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे मित्र आनंदा खेमलापुरे याच्या मदतीने ब्रम्हनाथ यांचा खून केल्याची कबुली भाऊ पवन याने दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस