शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

हुल्लडबाजी रोखणे सर्वांचीच जबाबदारी

By admin | Updated: November 16, 2015 00:29 IST

छत्रपती शाहू महाराज : नूतन नगरसेवक खेळाडूंचा सत्कार

कोल्हापूर : यंदा फुटबॉल हंगाम सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी खेळाडू, संघ व्यवस्थापन आणि फुटबॉल रसिकांची आहे. हुल्लडबाजांना अटकाव करण्याची जबाबदारी ही सर्वच फुटबॉल क्लब, व्यवस्थापन यांची आहे. या सर्वांनी शिस्तबद्धरितीने जर प्रत्येक सामन्यात सहकार्य केल्यास यंदाचा हंगाम विनाअडथळा पार पडेल, असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने दिवाळी फराळ व नूतन नगरसेवक खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोल्हापूरची शतकी फुटबॉल परंपरा अबाधित राहावी यासाठी मैदानात होणारी हुल्लडबाजी रोखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. खेळाडूंसह पंच, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि समर्थकांनी खिलाडीवृत्तीने वाटचाल करणे आवश्यक आहे.यंदाचा हंगाम सुरू करण्याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे प्रमुख व के.एस.ए.ची संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल असे माणिक मंडलिक यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक संभाजी जाधव, सचिन पाटील, विजय खाडे-पाटील, संतोष गायकवाड, नियाज खान यांचा फुटबॉल खेळाडू म्हणून, तर मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या स्नुषा व फुटबॉलपटू आश्किन आजरेकर यांच्या पत्नी निलोफर व जयश्री जाधव यांचा गौरव शाहू महाराज यांच्या हस्ते फुटबॉल, व्हिसल, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी कॅस्को कंपनीच्या फुटबॉलचे अनावरण श्रीमंत युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी दि. के. अतितकर, अरुण नरके, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे, विश्वास कांबळे-मालेकर, सरदार मोमीन, आदी उपस्थित होते.