शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वादात अभिनेत्रीची नाव जोडणे शोभत नाही, चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:44 IST

बीड प्रकरणी मुख्यमंत्री कोणालाही सोडणार नाहीत 

कोल्हापूर : एखाद्या राजकीय वादात अभिनेत्रीचे नाव जोडणे भाजपचे आमदार सुरेश धस यांना शोभत नाही, अशा शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी धस यांना रविवारी खडेबोल सुनावले.मंत्रिपद मिळाल्यानंतर मंत्री पाटील प्रथमच कोल्हापुरात दाखल झाले. रेल्वे स्थानकावर त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषी स्वागत केेले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणालाही सोडणार नाहीत, अशा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण तापले आहे. शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा झाला. याबाबत मंत्री पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सहा दिवसांच्या अधिवेशनात चार ते साडेचार तासांचा वेळ चर्चेसाठी दिला. सर्वांनी आपल्या भावना मांडल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, या प्रकरणी दोषींना सोडणार नसून कठोर पावले उचलली जाणार आहेत. धनंजय मुंडे यांच्या संदर्भात फडणवीस ठरवतील आणि त्यांनी कधीही डावा उजवा असे केलेले नाही.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. सुरेश धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करत अनेक अभिनेत्रींचीही नाव घेतली. यात अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचाही समावेश आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. या प्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना खडेबोल सुनावले.

मंत्री पाटील म्हणाले,  छत्रपती शिवरायांनी स्त्रीचे चारित्र्य आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची काटेकोरपणे काळजी घेतली. या प्रकरणात अभिनेत्रीचे नाव जोडणे सुरेश धस यांना शोभत नाही. धस यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधणार आहे. त्यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल, असे बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनीदेखील काल पत्रकार परिषद घेऊन भावना व्यक्त केल्या आहेत. धस यांना विनंती करेन की, पक्षाचा आमदार असूनदेखील तुम्ही असे काम करू नये.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणchandrahar patilचंद्रहार पाटीलSuresh Dhasसुरेश धसPrajakta Maliप्राजक्ता माळी